google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला स्टेशन रोड रुंदीकरण, डांबरीकरनाची अशोक कामटे संघटनेची मागणी

Breaking News

सांगोला स्टेशन रोड रुंदीकरण, डांबरीकरनाची अशोक कामटे संघटनेची मागणी

सांगोला स्टेशन रोड रुंदीकरण, डांबरीकरनाची अशोक कामटे संघटनेची मागणी 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) 

सांगोला शहरातील एचडीएफसी बँक , महात्मा फुले चौक–नेहरू चौक येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे व्यापारी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून सदर

 रस्त्याचे काम पूर्ण करावे याकरिता शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी व नगराध्यक्ष आनंदा माने यांना निवेदन देण्यात आले. 

शहरातील या प्रमुख मार्गाची दुरावस्था झाली असून नेहरू चौकापर्यंत या रस्त्याची रुंदी फारच कमी असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे , प्रसंगी नागरिकांना जीवही गमावावा लागलेला आहे तसेच भुयारी गटारी कामाकरीता या भागात 

सर्व रस्ते खोदल्याने प्रचंड प्रमाणात स्टेशन रोडवर धुळीचे लोट दिवसभर हवेमध्ये वातावरणात राहत असल्याने शहरवासीयांना दमा, खोकला व श्वसनाचे आजार वाढले आहेत तसेच येथील व्यावसायिकांवरही मोठा परिणाम झालेला आहे

 येथील समस्त व्यापाऱ्यांनी तात्काळ या रस्त्याच्या रुंदीकरण, दुभाजक तयार करून रस्ते करण्यात यावे अशी मागणी व्यापारी संघटना ,शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे .

अन्यथा येथील मागण्या व काम पूर्ण न केल्यास व्यापारी नगर परिषदेकडे कोणताही कर भरण्यास इच्छुक नसल्याचे कळविले आहे, व्यापारी तीव्र स्वरूपाचे रास्ता रोको आंदोलन महात्मा फुले चौकात करणार असल्याचे निवेदनाद्वारे कळविले. 

या निवेदनाच्या प्रती आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आमदार शहाजीबापू पाटील व जिल्हाधिकारी सोलापूर यांनाही देण्यात आल्याची माहिती अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने देण्यात आली. यावेळी शहरातील व्यापारी ,रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट:-(1)

शहीद अशोक कामटे संघटनेचे निवेदन प्राप्त झाले व त्या शिष्टमंडळाशी संपूर्ण सकारात्मक चर्चाही झाली हा रस्ता नवीन पूर्ण करण्याकरता नवनिर्वाचित नगराध्यक्ष, 

नगरसेवक यांची अनुमती मिळवून तात्काळ आवश्यक त्या निविदा प्रक्रिया राबवून हा मार्ग धुळमुक्त लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

डॉ. सुधीर गवळी मुख्याधिकारी नगरपरिषद सांगोला 

चौकट (२)

एक वर्षापासून प्रचंड धुळीचा व खराब रस्त्याचा मुकाबला येथील व्यावसायिक, रहिवाशी नागरिक करीत आहेत परिणामी व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन

 आरोग्य धोक्यात आले आहे हा प्रश्न येत्या पंधरा दिवसात निकाली न निघाल्यास आम्ही सर्व व्यापारी रास्ता रोको आंदोलन करणार आहे. 

मोहिंदर बनकर, व्यापारी सांगोला

चौकट (3)

एक महिन्यापासून नगरपालिका प्रशासनाकडे संघटनेचा पाठपुरावा या प्रश्ननी सुरू असून अद्याप तरी या रस्त्याची काम सुरू नाही केवळ नगरपालिकेने पाणी न मारता कायमस्वरूपी लवकरात

 लवकर येथील रस्ते करून धुळमुक्त सांगोला करावा अशी मागणी आमच्या शिष्टमंडळाने नगरपालिकेकडे केली आहे शहरवासीयांचा अंत पाहु नये याबाबत नगरपालिका प्रशासनाने पुढील कार्यवाही वेळेत करावी.

निलकंठ शिंदे सर ,अध्यक्ष:–शहीद अशोक कामटे संघटना

Post a Comment

0 Comments