google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..काटा काढायचा होता सासूचा, पण स्वता: चचं कुंकू पुसलं; पत्नीच्या 'त्या' कृत्याने सुखी संसार उद्धवस्त पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील घटना..

Breaking News

खळबळजनक..काटा काढायचा होता सासूचा, पण स्वता: चचं कुंकू पुसलं; पत्नीच्या 'त्या' कृत्याने सुखी संसार उद्धवस्त पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील घटना..

खळबळजनक..काटा काढायचा होता सासूचा, पण स्वता: चचं कुंकू पुसलं; पत्नीच्या


'त्या' कृत्याने सुखी संसार उद्धवस्त पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल पंढरपूर तालुक्यातील घटना..

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथे प्रियकराने प्रेयसीच्या मदतीने तिच्या सासूला विषारी औषध टाकलेले पाणी पाजून मारण्याचा कट रचला.

मात्र, ते विषारी औषध असलेले पाणी पिल्याने प्रेयसीच्या पतीचा मृत्यू झाला.

समाधान गणपत लोहार (वय ३४, रा. उंबरगाव, ता. पंढरपूर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

महिन्यानंतर गुरुवारी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, समाधान लोहार याचा विवाह सारिका (३२) हिच्याशी २०१३ साली झाला होता.

गेल्या चार वर्षापासून सारिकाचे शेखर संताराम चंदनशिवे याच्याशी प्रेमसंबंध होते. 

याबाबत पती समाधान व सासू विमल यांना माहीत होते. त्या सारिकावर सतत संशय घेत होत्या. त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या.

१० जानेवारी २०२६ रोजी सकाळी सातच्या वाजण्याच्या सुमारास शेखर याने सारिकाला गावातील एका शेतात बोलावून घेतले. 

विषारी औषध असलेली पाण्याची बाटली सारिकाला दिली. सारिकाने रात्री आठच्या सुमारास घरासमोरील कळशीतील पाण्यामध्ये विषारी औषध ओतले.

पाणी पिल्याने उलट्या

त्या कळशीतील पाणी एका तांब्यात सासूने पिण्यासाठी घेऊन, ते पाणी पिले. त्यावेळी त्यांना पिण्याच्या पाण्याची चव कडू लागली.

 ते पाणी पिवळसर दिसल्याने, सासूने तांब्यातील पाणी तिचा मुलगा (सारिकाचा पती) समाधानजवळ ठेवून गेल्या.

जेवणानंतर तांब्यातील पाणी समाधानने पिले. यामुळे त्याला रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उलट्या व त्रास होऊ लागला.

 त्यामुळे त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. समाधानचा १६ जानेवारीला उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Post a Comment

0 Comments