google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संकट समयी जनते सोबत असतो तोच खरा नेता--भाई चंद्रकांत सरतापे

Breaking News

संकट समयी जनते सोबत असतो तोच खरा नेता--भाई चंद्रकांत सरतापे

संकट समयी जनते सोबत असतो तोच खरा नेता--भाई चंद्रकांत सरतापे


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

जनता हेच आपले कुटुंब समजणारे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख हे कायम जनतेच्या

 संकटसमयी धावून जातात ‌राज्यात या दोन नेत्यांच्या निस्वार्थ कार्याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.

 राज्यात पावसाने माजवलेल्या हा-हा काराने  राज्यात बहुतांश भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.बिड,जालना, 

धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.या भागातील नद्या,नाले,ओढे दुथडी भरुन वाहत आहेत नद्यांना पुर आलेला आहे.त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

जनावरे वाहून गेली आहेत.अनेक घरात पाणी शिरल्याने कित्येकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

काही कुटुंबे पुराच्या पाण्यात अडकली आहेत.आशाच एका कुटुंबाला पाण्यातुन बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे कर्मचारी आले होते 

त्यांच्या सोबत धाराशिव चे युवा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही तरुणांना सोबत घेऊन रिक्स्यु आॕपरेशन मध्ये भाग घेऊन त्या कुटुंबातील व्यक्तींना वाचवण्यात यश मिळवले आहे.

  खा.ओमराजे हे सतत जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत असतात ते जनतेला आपले कुटुंब समजतात व संकट समयी ते मदतीसाठी धावुन जात असतात.

किरकोळ काम जरी असले तरी ते स्वतः जातीनीशी सोडवत असतात.

ही खासदार साहेबांची  ख्याती आहे.युवकांमध्ये त्याची प्रचंड लोकप्रियता आहे.जनता सुध्दा त्यांना साधा,सरळ,डामडौल न करणारा आपला नेता म्हणून कामाचा खासदार म्हणून पहाते.

  सांगोला विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी अल्पावधीतच आपल्या कामाने अनेकांच्या मनात घर केले आहे. संकट काळी थेट धाऊन जाणारे  

आमदार म्हणजे सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख अशी ख्याती निर्माण झाली आहे.आमदार बाबासाहेब देशमुख यांनी आमदार होण्या अगोदर व आता

 आमदार झाल्या नंतरही जनतेच्या सुख दुःखात सहभागी होत जनतेमध्ये मिसळून काम करण्याची त्यांची ख्याती आहे.आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख सुध्दा जनतेला आपले कुटुंब समजतात.

आपण त्या कुटुंबातील सदस्य आहोत या भावनेने बाबासाहेब देशमुख यांनी कोरोनो काळात हजारो लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत.अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

एखाद्या कुटुंबांवर आकस्मिक संकट आले तर आमदार बाबासाहेब देशमुख हे वेळ काळ न बघता तेथे जाऊन तात्काळ मदत करतात.पंढरपुच्या आषाढी वारीमध्ये दोन दिवस मुक्काम करुन

 आमदार डॉ बाबासाहेब देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.निकिताताई देशमुख यांनी वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या.आमदार असुनही  त्यांनी केलेली वारकऱ्यांच्या सेवेची राज्यभर चर्चा झाली होती.

   सांगोला तालुक्यातील काही गावांना पावसाने झोडपले आहे.आशा वेळी ज्या ज्या गावांमध्ये शेतीचे, घरांचे,जनावरांचे नुकसान झाले आहे 

आशा ठिकाणी सकाळी सात वाजता जाऊन त्या बाधीत कुटुंबांना आमदार साहेबांनी धिर देत त्यांना प्राथमीक मदत केली आहे.

आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या कामाची पध्दत पहाता ते अतीशय तत्पर व संकटं काळी धावून जाणारे नेते म्हणून ते ओळखले जात आहेत.

विशेषता डॉ बाबासाहेब देशमुख हे आमदार असुनही साधी राहणी व कुठला डामडौल नाही 

कि थाट माट नाही दिवस रात्र एकच ध्यास तो म्हणजे जनतेची निस्वार्थ पणे सेवा करणे स्व.आबासाहेबांचा वारसा चालवत आमदार बाबासाहेब देशमुख हे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत.

आमदार साहेबांनी आपला एका महिन्याच पगार पुरग्रस्तांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला असुन त्यांनी समाजीक बांधीलकी जपली आहे.आज राज्याला ओमराजे निंबाळकर यांच्या सारखे तरुण 

खासदार व डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या सारखे तरुण आमदार जे जनतेच्या संकट काळी धाऊन जाऊन मदत करतात

 अशा लोकप्रतिनिधीची गरज आसल्याचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments