google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पैशांसाठी सून छळाची परिसीमा! सांगोला तालुक्यात १० लाखांसाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार

Breaking News

पैशांसाठी सून छळाची परिसीमा! सांगोला तालुक्यात १० लाखांसाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार

पैशांसाठी सून छळाची परिसीमा! सांगोला तालुक्यात १० लाखांसाठी विवाहितेवर अमानुष अत्याचार


सांगोला (प्रतिनिधी) : पैशांच्या हव्यासापोटी एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील सासरच्या मंडळींनी अवघ्या तीन महिन्यांतच विवाहितेला १० लाख रुपयांची मागणी करत बेल्टने मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

पीडिता प्रतिक्षा दिग्विजय पवार (वय २४, मूळ रा. अंकोली, ता. मोहोळ, जि. सोलापूर; सध्या रा. हलदहिवडी, ता. सांगोला) हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नानंतर काही दिवसातच तिच्यावर छळ सुरू झाला. 

“घरखर्चासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवतो,” असा दबाव टाकत पती दिग्विजय दीपक पवार याने वेळोवेळी बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे.

याशिवाय सासू वैशाली दीपक पवार आणि सासरे दीपक गोपीचंद पवार यांनी देखील पैशांच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. इतकेच नव्हे तर विवाहितेला उपाशी ठेवून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ/३११ बोराटे करीत आहेत.

👉 महत्त्वाचे: पैशांसाठी विवाहितेचा छळ हा गंभीर गुन्हा असून अशा घटनांमुळे समाजात संतापाची लाट उसळत आहे.

Post a Comment

0 Comments