google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात दमदार वाढदिवस सोहळा! फॉर्च्युनर गाडीची भव्य भेट; “मैत्रीचा राजा” प्रशांत (पप्पू) धनवजीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Breaking News

सांगोल्यात दमदार वाढदिवस सोहळा! फॉर्च्युनर गाडीची भव्य भेट; “मैत्रीचा राजा” प्रशांत (पप्पू) धनवजीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सांगोल्यात दमदार वाढदिवस सोहळा! फॉर्च्युनर गाडीची भव्य भेट;



“मैत्रीचा राजा” प्रशांत (पप्पू) धनवजीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहरातील भिमनगर येथे गटनेते तथा नगरसेवक मा. प्रशांत (पप्पू) धनवजीर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 या सोहळ्याला विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून, कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या विशेष प्रसंगी P.D. ग्रुपच्या वतीने प्रशांत धनवजीर यांना फॉर्च्युनर गाडीची भव्य भेट देण्यात आली. या आगळ्यावेगळ्या भेटीमुळे कार्यक्रमाची विशेष चर्चा रंगली.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष आनंद भाऊ माने, जिल्हा परिषद सदस्य अतुल (मालक) पवार, मा. चेतनसिंह केदार, काशिलिंग गावडे, माऊली तेली, सतीश भाऊ सावंत,

 उपसभापती अजय सरगर, उपनगराध्यक्ष नितीन भाऊ इंगोले, नगरसेवक सोमेश यावलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भिम शक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय बापू बनसोडे, बापूसाहेब ठोकळे, 

संपादक संतोष साठे, दिलीप मस्के, पत्रकार पवन बाजारे, पांडुरंग ऐवळे, युवा नेते आकाश आठवले, दादा बनसोडे, संतोष मदने प्रशांत गावडे कांबळे इंजिनिअर निकोप ठोकळे सोमनाथ ठोकळे 

नितीन शिंदे तसेच पंढरपूर व सोलापूर येथून आलेल्या नगरसेवकांनीही मै हु ना ग्रुप सांगोला उपस्थिती लावून शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी बोलताना मा. चेतनसिंह केदार यांनी प्रशांत धनवजीर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “कोणताही पक्ष, जात-पात न पाहता सर्वांना सोबत घेऊन चालणारा, मैत्री जपणारा 

नेता म्हणजे प्रशांत (पप्पू) धनवजीर.” त्यांच्या कार्यामुळे ते तरुणांच्या हृदयातील धडकन बनले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशांत धनवजीर हे संयमी, सर्वांशी मैत्रीपूर्ण वागणारे आणि समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेतृत्व 

म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना “मैत्रीचा राजा” अशी ओळख मिळाली आहे.

एकूणच, हा वाढदिवस सोहळा उत्साह, एकोपा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ठरला. 🎉

Post a Comment

0 Comments