google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा; विकासकामे, नामकरण आणि खर्च मंजुरीवर नगराध्यक्ष श्री. आनंदा गोरख माने यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय

Breaking News

सांगोला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा; विकासकामे, नामकरण आणि खर्च मंजुरीवर नगराध्यक्ष श्री. आनंदा गोरख माने यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाचे निर्णय

सांगोला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा; विकासकामे,


नामकरण आणि खर्च मंजुरीवर नगराध्यक्ष श्री. आनंदा गोरख माने यांच्या अध्यक्षतेखाली  महत्त्वाचे निर्णय

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा दिनांक २४ मार्च २०२६ रोजी पार पडली असून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. 

नगराध्यक्ष श्री. आनंदा गोरख माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहर विकास, दैनंदिन प्रशासन आणि आर्थिक बाबींशी संबंधित अनेक प्रस्ताव मांडण्यात आले.

सभेची सुरुवात मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी देऊन करण्यात आली. त्यानंतर सांगोला शहरातील आरक्षण क्रमांक ४७ (बगीचा)

 यास “महाराजा यशवंतराव होळकर उद्यान” असे नामकरण करण्याबाबत विविध सामाजिक संस्था व नगरसेवकांनी केलेल्या मागणीवर चर्चा करण्यात आली.

विद्युत विभागाकडील दैनंदिन देखभाल व दुरुस्ती कामांसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मनुष्यबळ पुरवठा करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला. 

शहरातील सुमारे ४५०० एलईडी पथदिवे, ७५ हायमास्ट तसेच विविध इमारतींची देखभाल करण्यासाठी 

७ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून यासाठी वार्षिक सुमारे २३.४४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले.

भांडार विभागाकडून कार्यालयीन स्टेशनरी साहित्य पुरवठ्यासाठी ३ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली. 

मागील वर्षाच्या तुलनेत खर्च कमी झाल्याने पुढील वर्षासाठी मंजुरी घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.

याशिवाय शहरात नवीन रोडलाईट उभारणी, पाणीपुरवठा सुधारणा, विविध विकासकामांना मुदतवाढ, व्यापारी गाळ्यांचे 

हस्तांतरण, तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांसाठी साहित्य व सेवांच्या निविदा प्रक्रिया राबविणे यांसारखे अनेक विषय सभेत चर्चेस आले.

पाणीपुरवठा विभागाकडील योजनांसाठी वाढीव पाणी आरक्षण, दर सुधारणा तसेच देखभाल दुरुस्ती कामांना मंजुरी देण्याबाबतही विचारविनिमय झाला.

 तसेच स्वच्छ भारत अभियान, रस्ते विकास आणि मलनिस्सारण प्रकल्पांनाही मुदतवाढ देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले.

सभेच्या शेवटी अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने आयत्या वेळचे विषयही घेण्यात आले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही सभा महत्त्वाची ठरल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments