google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला-पंढरपूर रोडवर दरोडेखोरांचा कहर! थार गाडीतून धडक एन्ट्री; 2.50 लाखांची लूट, आरोपी फरार

Breaking News

सांगोला-पंढरपूर रोडवर दरोडेखोरांचा कहर! थार गाडीतून धडक एन्ट्री; 2.50 लाखांची लूट, आरोपी फरार

सांगोला-पंढरपूर रोडवर दरोडेखोरांचा कहर! थार गाडीतून धडक एन्ट्री; 2.50 लाखांची लूट, आरोपी फरार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला-पंढरपूर मार्गावर रात्री उशिरा घडलेल्या धाडसी दरोड्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. निर्भयपणे फिरणाऱ्या दरोडेखोरांनी थेट रस्त्यावर वाहन 

अडवून 2 लाख 50 हजार रुपयांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटून नेल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप भागोजी पाटील (वय 58, रा. कोल्हापूर) हे 21 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सांगोला-पंढरपूर मार्गावरून प्रवास करत होते. सांगोला पुलाजवळ अचानक विनानंबर काळ्या ‘थार’ गाडीने त्यांच्या वाहनाला कट मारत जबरदस्तीने थांबवले.

क्षणात गाडीतून उतरलेल्या चार अज्ञात इसमांनी शिवीगाळ करत आणि जीवाची धमकी देत वाहनातील दोन बॅगा हिसकावून घेतल्या. 

एका बॅगेत 2.50 लाखांची रोकड आणि दोन मोबाईल, तर दुसऱ्या बॅगेत आधार, पॅन आणि एटीएम कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे होती. काही क्षणांतच आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

या घटनेमुळे सांगोला-पंढरपूर मार्गावर भीतीचे सावट पसरले असून, रात्री प्रवास करणारे नागरिक धास्तावले आहेत. “रस्त्यावरही सुरक्षितता नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 256/2026 नोंदवण्यात आला असून बीएनएस कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास 

आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस कर्मचारी पाटील व उबाळे तपास करत आहेत.

“दरोडेखोर कुठेही लपले तरी सुटणार नाहीत!”

असा इशारा देत पोलिसांनी आरोपींना लवकरच गजाआड करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments