विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य! जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्या हस्ते शालेय दप्तरांचे वाटप
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
आज शाळेत एक आनंददायी आणि प्रेरणादायी उपक्रम पार पडला. जिल्हा परिषद सदस्य श्री. अतुल प्रभाकर पवार यांच्या वतीने
विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या वाटप कार्यक्रमात “प्रत्येक पालकांच्या एका पाल्यास एक” या तत्त्वानुसार दप्तरांचे वितरण करण्यात आले.
तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या पहिलीच्या दोन विद्यार्थ्यांनाही विशेषतः बॅग देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. एकूण २४ विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोठी मदत मिळाली असून, त्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे.
शाळेच्या वतीने श्री. अतुल पवार यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात
शिक्षणाबद्दल सकारात्मक संदेश जात असून, विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे. 🙏🏻


0 Comments