धक्कादायक...सांगोला-पंढरपूर रोडवर मृत्यूचा थरार! क्षणात
होरपळलं आयुष्य; पती-पत्नी जागीच संपले
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे 9503487812)
सांगोला : सांगोला-पंढरपूर मार्गावर रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.
देशमुख वस्ती परिसरात घडलेल्या या थरारक दुर्घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी रामचंद्र बनसोडे (वय 50) आणि रामचंद्र पांडुरंग बनसोडे (वय 58, रा. राबामणी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हे दाम्पत्य
सांगोला-पंढरपूर मार्गावरून प्रवास करत असताना अचानक अपघातग्रस्त झाले. अपघात इतका भीषण होता की दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच शिवाजी बाबुराव चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालय,
सांगोला येथे हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करताच उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (रजिस्टर क्र. 45/2026) म्हणून करण्यात आली आहे.
ग्रामीण रुग्णालयातील डॉ. माळी यांनी याबाबत माहिती दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भातुंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी
सांगोला-पंढरपूर मार्गावरील वाढत्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. 🚨





0 Comments