सांगोल्यात तुफान हाणामारी! तलवार-लाठ्यांसह 33 जणांवर गुन्हा दाखल
सांगोला (प्रतिनिधी) – शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शेतकरी महिला
सुत गिरणीसमोरील हायवे रोडलगत मोकळ्या जागेत दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीप्रकरणी तब्बल 33 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी बाबासाहेब वसंत पाटील (वय 38, सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गु.र.न. 277/2026
अन्वये बीएनएस कलमे 194(2), 189(2), 189(3), 189(4), 189(5), 191(2), 191(3), 190 तसेच शस्त्र अधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
📍 घटना कधी व कुठे?
दि. 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8:15 वाजण्याच्या सुमारास, सांगोला शहरातील शेतकरी महिला सुत गिरणीसमोरील हायवे रोडच्या पलीकडे मोकळ्या जागेत ही घटना घडली.
⚔️ तलवार, लाठ्यांसह हल्ला
दोन्ही गटांतील आरोपींनी लोखंडी तलवार, लाठ्या-काठ्यांचा वापर करत एकमेकांवर हल्ला केला. विशेष म्हणजे बंडू दामू मासाळ याने हातात तलवार घेऊन हाणामारीत सक्रिय सहभाग घेतल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
👮 पोलीस हस्तक्षेपानंतरही आदेश धुडकावले
पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन जमावाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी पोलिसांचे आदेश न पाळता मारामारी सुरूच ठेवली आणि सार्वजनिक शांततेचा भंग केला.
👥 मुख्य आरोपींची नावे:
सचिन ज्ञानेश्वर हजारे, काशिलिंग पांडुरंग गाडेकर, अतुल विष्णू येडगे, दत्तात्रय नाना झेडगे, गणेश शिवाजी नवले, सागर दाजी मोरे, सुभाष शिवाजी मेटकरी,
दीपक राजाराम वगरे, विक्रम विलास मेटकरी, सुरज तानाजी मेटकरी, दीपक दत्तात्रय मासाळ, अतिक रहमान मुजावर, अरमान फारुक शेख, बंडू दामू मासाळ, शरद रामचंद्र मासाळ,
विलास मारुती खांडेकर, पैगंबर गुलाब मुलाणी, आदिनाथ कल्लाप्पा वारे, सोमनाथ मारुती मंडले, नागेश बापू मोरे, बिरा दामू मासाळ, अंकुश तुकाराम शेंबडे, वैभव रावसाहेब शेंबडे, सिद्धेश्वर तुकाराम शेंबडे, बाळू भिमा मेटकरी,
शिवाजी बापू मेटकरी, तानाजी आनंदा मेटकरी, कुमार आनंदा मेटकरी, उल्हास गोरख मेटकरी, प्रभाकर यशवंत सरगर, रावसाहेब शिवाजी मेटकरी, बाबू बापू मेटकरी, युवराज बाळू मेटकरी.
📌 पोलिसांची कारवाई सुरू
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ/484 बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आला असून आरोपींवर कडक कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
👉 सांगोल्यातील वाढत्या गँगवारसदृश घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे.


0 Comments