google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकरी, भुमिहीन नागरीक व शेतमजूरांना तातडीने मदत द्यावी: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Breaking News

राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकरी, भुमिहीन नागरीक व शेतमजूरांना तातडीने मदत द्यावी: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

राज्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त शेतकरी, भुमिहीन नागरीक व शेतमजूरांना तातडीने


मदत द्यावी: आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील विविध भागामध्ये यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर तसेच सर्वसामान्य नागरीकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालेले आहे. अनेक गावामध्ये

 नदी, नाले तुडूंब भरल्याने पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच जनावरे ही मोठ्या प्रमाणात दगावली आहेत. 

त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व भुमिहीन नागरीक पूर्णपणे उध्वस्त झालेले आहेत. आपण यासाठी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्यांना मदत जाहीर केली आहेच, परंतु बाधितांची संख्या लक्षणीय असल्याने अधिकच्या मदतीची आवश्यकता आहे. 

यासाठी आपलेकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत केल्याने संबंधितांना दिलासा मिळेल. यासाठी शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शेती व्यवसायाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने राज्यातील शेती लगेच पिकणार नाही .त्यामुळे शेतमजूर व भुमिहीन नागरीक यांना लगेच रोजगार उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व भुमिहीन नागरीक यांचेवर उपासमारीची वेळ आली आहे. 

त्या गावांचे अर्थकारण व पर्यायाने महाराष्ट्राच्या अर्थकारणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. यासाठी शेतकरी, शेतमजूर व भुमिहीन नागरीक यांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत त्यांना आर्थिक मदत करणे  आवश्यक आहे.

राज्यातील जमिनी अतिवृष्टी व पुरामुळे खरवडून गेलेल्या असल्यामुळे पुढच्या वर्षीसुध्दा शेती व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता आहे. याचा राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होणार असल्याने याबाबतचे भविष्यातील नियोजन आपण करालच. या बाबतही विनंती आहे.

पूरस्थितीमुळे बाधित गावांचा नदीकाठ व आपत्तीग्रस्त भागाच्या यादीत तातडीने समावेश करण्यात यावा. जेणेकरुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेता येईल. सर्व बाबीचा विचार करुन अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकरी,

 शेतमजूर व भूमिहीन नागरीक यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत करुन दिलासा  द्यावा अशी मागणी आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments