google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पोलिसांची गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पोलिसांची गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई

ब्रेकिंग न्यूज..सांगोला शहरात पोलिसांची गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला पोलीस शहर परिसरात गस्त करीत असताना संशयावरून पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली. टेम्पोत एक लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा, 

पानमसाला व पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा सुमारे सहा लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना शनिवारी सांगोला येथे घडली आहे.

सांगोला पोलीस हे शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास सांगोला शहरात गस्त करीत असताना संशयित

अशोक लॅलड कंपनीचा टेम्पो (एमएच ४२ बीएफ ८६६१) शहरामध्ये संशयितरीत्या फिरत असताना निदर्शनास आला. पोलिसांनी या वाहनास थांबवून वाहनाची झडती घेतली 

असता टेम्पोमध्ये बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. टेम्पो चालक संभाजी अमसिध्दराव बन्ने (वय ४१, रा. कमलापूर, ता. सांगोला) यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. 

पोलिसांनी विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, असा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व पाच लाख रुपये किमतीचे वाहन असा सुमारे सहा लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे,

Post a Comment

0 Comments