google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक..कडलास व सरगरवाडी येथील दोन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

Breaking News

खळबळजनक..कडलास व सरगरवाडी येथील दोन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

खळबळजनक..कडलास व सरगरवाडी येथील दोन तरुणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला दोन वेगवेगळ्या घटनेत विहिरीजवळील पेटीतील विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी कडलास व सरगरवाडी (नाझरे) (ता. सांगोला) येथे घडली. 

महेश ऊर्फ निलेश दगडू काटकर (वय २१, रा. अकोला रोड, सोमनाव मंदिराजवळ, कडलास, ता. सांगोला) व गोरख ऊर्फ प्रमोद संतोष सरगर (वय ३०, रा. सरगरवाडी (नाझरे) अशी दोघांची नावे आहेत.

निलेश ऊर्फ महेश काटकर हा रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पराजवळ असलेल्या इलेक्ट्रिक मोटारीच्या पेटीमध्ये वीज आहे का नाही हे पाहण्यासाठी गेला असताना शेतात सर्वत्र पाणी असल्याने त्यास सुरवातीला हाताला विजेचा शॉक

बसला नंतर शरीराला वापर चिकटल्याने महेश हा गंभीर जखमी होऊन जमिनीवर पहला विजेचा शौक लागल्याने उपचारापूर्वीच मृत पावल्याची घटना घडली आहे

गोरख सरगर संतोष सरगर हा तरुण

गौरख ऊर्फ प्रमोद हा शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटार सुरू करण्यासाठी गेला असताना त्यास विजेचा शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता त्यास सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले 

असता गोरख सरगर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याचाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर लवटे यांनी पोलिसांत खबर

माण नदीवरील पुलावरून उडी मारल्याने एकजण बेपत्ता

दिली आहे. वाढेगाव (ता. सांगोला) येथील अंगावर लाल शर्ट असलेल्या अनोळखी ४५-५० वर्षीय व्यक्तीने माण नदीवरील पुलावरून चप्पल पुलावर सोडून नदीत उडी मारल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. 

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी नदी पुलावर धाव घेतली, परंतु नदीस पूर आल्याने उडी मारलेला व्यक्ती सापडू शकला नाही, वाढेगाव येथील नागरिकांनी तहसीलदार संतोष कणसे यांना यावावत माहिती दिली.

 तहसीलदार कणसे यांनी भेट देऊन पाहणी करून माण नदीस पूर आल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे,

Post a Comment

0 Comments