नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित आपदग्रस्त व्यक्तींना तातडीने मदत करा – शाहरुख मुलाणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला. (प्रतिनिधी) – सांगोला तालुक्यातील गावागावात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे प्रचंड नुकसान झाले असून या बाधित झालेल्या आपदग्रस्त व्यक्तींना मदत करा
असे रुग्ण हक्क परिषद मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी सांगोला तहसिलदार संतोष कणसे यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी दरम्यान सांगितले आहे.
दरम्यान पावसाच्या अनियमिततेमुळे तसेच अतिवृष्टी, वादळ यांसारख्या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे. काही ठिकाणी जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण झाली असून घरांची, शेतमालाची व मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे आढळून आले.
या पार्श्वभूमीवर मुलाणी म्हणाले, “शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आज त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शासन व प्रशासनाने विलंब न करता पंचनामे करून शेतकऱ्यांना व आपदग्रस्त ग्रामस्थांना आर्थिक मदत, पीकविमा,
तात्पुरते निवारा केंद्र, जनावरांसाठी चारा व पाणी यांची तातडीने व्यवस्था करावी. आपत्ती ही कोणत्याही एका कुटुंबावर नाही तर संपूर्ण समाजावर येते, त्यामुळे प्रत्येक नागरिकानेही मदतीसाठी पुढे यावे.”
तहसीलदार संतोष कणसे यांनी मुलाणी यांच्याकडून मांडण्यात आलेल्या मागण्यांची नोंद घेतली असून लवकरच आपत्तीग्रस्त गावांचा अहवाल
जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून आवश्यक ती सर्व मदत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी आपल्या समस्या मुलाणी व तहसीलदार यांच्यासमोर मांडल्या. काही शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती दिली.
त्यावर मुलाणी यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून शासन दरबारी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
सांगोला तालुक्यातील आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी, हीच आजची वेळेची गरज आहे, असे मुलाणी यांनी ठामपणे सांगितले.
याप्रसंगी उदनवाडी गावातील सरपंच सौ. विमल सरगर, ग्रामसेवक जयवंत लवटे, तलाठी वंदना गुप्ता , सहाय्यक कृषी अधिकारी श्याम शिंदे, जलसंधारण उपअभियंता हणमंत गळवे,
बालेखान शेख, माजी सरपंच फारूक मुलाणी, मुख्याध्यापक राजाराम वलेकर यांच्या सह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
चौकट :- सर्व पंचनामे करून तात्काळ कार्यवाही करू – तहसिलदार संतोष कणसे
दरम्यान बेलवन नदीवर उदनवाडीत असलेल्या पुलाची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली, ज्यांचे घराची पडझड झाली
त्यांचे पंचनामे करून तात्काळ मदत करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे सूचना तलाठी, सहाय्यक कृषी अधिकारी यांना दिल्या.



0 Comments