google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..गुडघ्याभर पाण्यातून प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे.. तालुक्यात खळबळ..

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..गुडघ्याभर पाण्यातून प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे.. तालुक्यात खळबळ..

ब्रेकिंग न्यूज..गुडघ्याभर पाण्यातून प्रेतयात्रा स्मशानभूमीकडे.. तालुक्यात खळबळ..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

चोपडी,नाझरे परिसरात गेली दोन दिवस प्रचंड मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणीचे रस्ते बंद आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे चोपडी येथील गावतळ पूर्णपणे भरले असते येदुचामळा,रानमळा, सोमेवाडी कडे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे. 

आज रानमळ्यातील एका महिलेचे निधन झाले. त्या महिलेचे प्रेत विविध प्रकारच्या समस्येतून तसेच गुडघ्याभर पाण्यातून ग्रामस्थांनी चोपडी येथील स्मशानाकडे आणले.

चोपडी रानमळा येथील आप्पासो विठोबा बाबर व विष्णू विठोबा बाबर यांची बहीण श्रीमती वैजयंता यांचं आज सकाळी निधन झालं आहे, त्यांचा अंत्यविधीचा झोपडी येथील प्रशांत भूमी सकाळी दहा वाजता होणार होता

 प्रेतयात्रा रणमळा येथून निघाली मात्र गाव तळ्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर असणाऱ्या गुडघ्याभर पाण्यातून ही प्रेतयात्रा कशीबशी बाहेर पडली. प्रेतयात्रेस खांदा देणाऱ्या खांदेकरांचे खूप हाल झाले.

प्रेत यात्रेत चालणारी मंडळी प्रचंड हाल सोसावे लागले.खरंतर गेल्या आठवड्यापासून हा रस्ता बंद आहे.गाव तळ्याच्या काठावरून घसरड्या रस्त्यातून त्या भागाकडे लोक जात आहेत.

 या गोष्टीची दखल प्रशासनाने घ्यायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे येदुचा मळा,रानमळा, यादव मळा, चौगुले मळा, जयराम मळा, गव्हाणे वस्ती या मळ्याकडे जाणाऱ्या लोकांचे हाल होत आहे.

 याबाबत तेथील लोकांनी नाराजी व्यक्त केली असून गाव तळ्यावरून जाणारा हा रस्ता तात्काळ सर्वसामान्यांसाठी प्रशासनाने खुला करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments