google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषकचा श्री.केरला वर्मा कॉलेज,त्रिशूर,केरळ संघ ठरला मानकरी सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार

Breaking News

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषकचा श्री.केरला वर्मा कॉलेज,त्रिशूर,केरळ संघ ठरला मानकरी सांगोल्यात तीन दिवस रंगला बास्केटबॉल सामन्यांचा थरार

गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषकचा श्री.केरला वर्मा कॉलेज,त्रिशूर,केरळ संघ ठरला मानकरी सांगोल्यात तीन दिवस रंगला  बास्केटबॉल सामन्यांचा थरार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४४ वा स्मृती समारोह २०२५ आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा ४३ वर्षांची समृद्ध परंपरा

 जोपासत यावर्षीपासून राष्ट्रीय स्पर्धा दि.१२ संप्टेबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत प्रचंड उत्साहात संपन्न झाल्या.अंतिम सामन्यावेळी केरळ व फाल्कन्स, मुंबई या दोन संघादरम्यान चुरशीच्या व उत्कंठावर्धक खेळातून 

श्री केरला वर्मा कॉलेज त्रिशूर, केरळ हा संघ विजेता झाला व कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा स्मृती चषक व रोख रक्कम मानकरी ठरला.  या स्पर्धेतील उपविजेता म्हणून फाल्कनस् 

 मुंबई, तृतीय क्रमांक जय हिंद-कडा  बीड,चतुर्थ क्रमांक जी.के.पी. मुंबई पाचवे पारितोषिक सातारा,नांदेड,सोलापूर, मुंबई या कॉर्टर फायनल मधील उपविजयी संघास,व सहावे पारितोषिक साखळी सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे 

संघ विजयपुरा,मुंबई,घाटकोपर,अकलूज,नागपुर,मिरज या संघास रोख रक्कम व झपके कुटुंबीयांकडून कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात  आली.

तसेच वैयक्तिक नैपुण्यादरम्यान उत्कृष्ट खेळाडू म्हणून जी.के.पी.-मुंबई संघाचा इमरान खान, बेस्ट शूटर म्हणून श्री केरला वर्मा कॉलेज त्रिशूर,केरळचा

 अश्विन कृष्णा,                उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू म्हणून सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचा श्रेयश अजित पाटील व सांगोला भागातील गुणवंत बास्केटबॉल खेळाडू म्हणून 

अर्पिता रविंद्र अरबळी यांना व  सोलापूर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंचे मास्टर्स टीम तयार करून विशेष सामने खेळवले गेले त्यामधील विजयी  संघ व सर्व मास्टर्स खेळाडू यांना सन्मानित करण्यात आले.

    सुरुवातीला  संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.

  यावेळी व्यासपीठावर पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर,

कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वविजेत्या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार कु. प्रियंका इंगळे, विश्वविजेता भारतीय खो- खो संघाचे सदस्य,अश्विनी शिंदे आंतरराष्ट्रीय खो 

-खो खेळाडू रामजी कश्यप, राष्ट्रीय खो-खो कोच सोमनाथ बनसोडे, अखिल भारतीय खो-खो खेळाडू शहेनशहा मुजावर संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे 

अध्यक्ष बाबुराव गायकवाड,उद्योगपती सिद्धार्थ झपके,विलास क्षीरसागर,नागेश तेली, श्रीनिवास देशपांडे, बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

   या कार्यक्रमासाठी  सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, 

 संस्था कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी,दिगंबर जगताप,शीलाकाकी झपके,विश्वेश झपके,   विविध राज्यातील  निमंत्रित खेळाडू त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, 

गावातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा प्रेमी,पत्रकार बांधव यांच्यासह विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय अधिकारी,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी

 बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के, सर्व पदाधिकारी,सामना समिती सर्व पदाधिकारी, क्रीडा शिक्षक,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.

पंच सत्कार निवेदन प्रशांत मस्के यांनी केले. पारितोषिक समारंभाचे निवेदन सुनील भोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण  यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य अमोल गायकवाड  यांनी केले.

ग्रामीण भागात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गेली ४३ वर्ष राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे व यावर्षीपासून राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले जात आहे ही गोष्ट प्रत्येक खेळाडूला प्रचंड स्फूर्ती देणारी आहे. 

ज्याने मैदानावरचा लळा आणि जिव्हाळा जपला तो खऱ्या अर्थाने जगण्यातल्या प्रत्येक कसोटीवर यशस्वी होत राहतो. खेळामध्ये जिंकणं हरणं हा काही क्षणांचा भाग असतो

 मात्र मैदानावर असलेली निष्ठा आणि खेळा वरती असलेलं प्रेम हे तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवत. ग्रामीण भागातला खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतो हे या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्ध होत आहे.

 मी माणदेशी पट्ट्यातील आहे, आमच्याकडे पाऊस कमी पडतो त्यामुळे असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते .अशा सर्व समस्यातूनही मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वेळोवेळी मला स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळत गेले. 

सांगोल्यासारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारचे इंनडोर स्टेडियम होते याचा निश्चितपणाने मला सार्थ अभिमान वाटतो. म्हणून मला वाटते की मैदानावरच्या जिंकण्यात जगण्याची यशस्वीता आहे. ललिता बाबर आंतरराष्ट्रीय धावपटू

सांगोले सारख्या ग्रामीण भागात स्वातंत्रसैनिकाच्या स्मृतीसमरोहानिमित्त आयोजित राष्ट्रीय पातळीवरचे बास्केटबॉलचे सामने बघताना डोळ्याचे पारणे फिटणे म्हणजे काय असते हे अनुभवले.

 त्यामुळे झपके कुटुंबीयांनी मला आमंत्रित केले यांचा मनस्वी आनंद आहे.माझा विविध प्रकारच्या अडचणींवर मात करत विश्वविजेत्या भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदापर्यंतचा प्रवास तुम्हाला एवढेच सुचित करतो

  आपल्या मनात जिद्द व चिकाटी असेल तर आपण खेळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकतो . प्रियंका इंगळे कर्णधार विश्वविजेता भारतीय महिला खो-खो संघ

गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त ४३ वर्षे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धांचे आयोजन आम्ही करत आहोत.

 यावर्षी  या स्पर्धेला केरळ, कर्नाटक राज्यातून प्रतिसाद मिळाल्याने ही राष्ट्रीय स्पर्धा झाली याचा निश्चितपणे अभिमान आहे . नवीन इंनडोअर स्टेडियममुळे  पावसाचा व्यत्यय झाला नाही. 

तसेच ग्रामीण भागातील खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे व अशा स्पर्धेच्या माध्यमातून ती सिद्ध होत आहे.भारतीय बास्केटबॉल संघाचे कोच संभाजी कदम हे याच मैदानावरील खेळाडू आहेत.

तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे,अध्यक्ष व विविध पदावरील खेळाडू ग्रामीण भागातील आहेत असे सांगत प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा हेतू सांगत उपस्थितांचे स्वागत केले..

आज सकाळी १० वाजता सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रसिद्ध व्याख्याते बीड राहुल गिरी यांच्या शुभहस्ते व  

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला  अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.

या समारंभामध्ये कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके, जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण होणार आहे..*

Post a Comment

0 Comments