google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तहसिलदार संतोष कणसे यांनी जाणून घेतल्या आजी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांच्या अडीअडचणी.

Breaking News

सांगोला तहसिलदार संतोष कणसे यांनी जाणून घेतल्या आजी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांच्या अडीअडचणी.

सांगोला तहसिलदार संतोष कणसे यांनी जाणून घेतल्या आजी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांच्या अडीअडचणी.


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:-पंतप्रधान मा.श्री. नरेद्रजी मोदी यांचा जन्मदिवस दि. १७सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान

 'सेवा पंधरवडा "साजरा करणेबाबत महाराष्ट्र शासनाने सुचित केले आहे. सदर कार्यक्रमा अंतर्गत सोमवार आज दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता सांगोला तालुक्यातील

 आजी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियाच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. सदर बैठकीस सांगोला तालुक्यातील मोठ्या संख्येने आजी, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. 

सांगोल्याचे तहसीलदार संतोष कणसे, यांनी एकुण १५ माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या अडअडचणी जाणून घेतल्या

 व महसूल विभागाशी संबंधित असलेल्या एकूण ०८ तक्रारीचे निरासन सदर बैठकीमध्येच केले व इतर विभागासी संबधित असलेल्या एकूण ०७ तक्रारी सबंधित विभाग प्रमुख गटविकास अधिकारी, 

उपअभियंता म.रा. वि. वि. कंपनी, पोलीस स्टेशन सांगोला तसेच सहायक निबंधक संस्था सांगोला यांचेशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधुन आजी/माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियांच्या तक्रारीचे शिघ्रतेने निरासरण करणेबाबत सुचना दिल्या.

सर्व आजी/माजी सैनिक व त्यांचे कुटुंबियानी तहसिलदार सांगोला यांचे याबाबत आभार व्यक्त केले व शेवटी सुबेदार मेजर रविकांत गणपत मराळ माजी सैनिक यांनी बैठक संपन्न झालेची घोषणा केली.

Post a Comment

0 Comments