google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक घटना! 'दारूसाठी आई-वडिलासह बहिणीवर कोयत्याने हल्ला'; मुलाविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा

Breaking News

धक्कादायक घटना! 'दारूसाठी आई-वडिलासह बहिणीवर कोयत्याने हल्ला'; मुलाविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा

धक्कादायक घटना! 'दारूसाठी आई-वडिलासह बहिणीवर कोयत्याने हल्ला'; मुलाविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने करांडेवाडी (ता. सांगोला) येथे मुलाने आई- वडील व बहिणीवर कोयत्याने हल्ला करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

रुक्मिणी गोरख करांडे (वय ६५, रा. करांडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रावसाहेब गोरख करांडे याच्याविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रावसाहेब हा घरात आला. दारू पिण्यासाठी पैसे देत नाही 

या कारणावरून त्याने घरातील वडील गोरख करांडे यांच्यावर हातातील लोखंडी कोयत्याने वार करून त्यांच्या डाव्या हाताची करंगळी व अंगठा जखमी केला.

त्यानंतर बहीण आशाबाई करांडे हिच्याही अंगठ्याजवळील बोट व करंगळीवर वार करून गंभीर दुखापत केली. 

तसेच त्याने आई रुक्मिणी व आशाबाई या दोघींनाही हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

या हल्ल्यात वडील व मुलगी जखमी झाले. पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments