google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...एसटीतून उतरली अन् चाकाखाली गेली; मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

Breaking News

धक्कादायक ...एसटीतून उतरली अन् चाकाखाली गेली; मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना

धक्कादायक ...एसटीतून उतरली अन् चाकाखाली गेली; मोलमजुरी करणाऱ्या महिलेचा मृत्यू, कोल्हापुरातील घटना


बसमधून खाली उतरताच घडले भयानक; घराजवळच महिलेला एसटीने चिरडले

कोल्हापूर येथून बसने घरी परतलेल्या महिलेवर काळाने झडप घातली आहे. बसमधून प्रवास करत आल्यानंतर बसथांब्यावर महिला उतरली. मात्र बसमधून उतरल्यानंतर रस्त्याच्या बाजूने जात असताना त्याच बसने धडक देत महिलेला चिरडले.

सांगली कोल्हापूर रोडवर सोमवारी महिलेचा गाडी खाली चिरडून मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली. या घटनेला सर्वस्वी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशानाच्या अनास्थेचा 

हा बळी असल्याचा आरोप करत आज सर्वपक्षीय कृती समितीचे तर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलकांनी महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मोलमजूरी करत उदरनिर्वाह करून आपले कुटुंब चालवणाऱ्या महिलेचा प्रशासकीय अनास्थेमुळे बळी गेला. एक महिला कामानिमित्त कोल्हापूरला जाऊन तेथून सायंकाळी पुन्हा आपल्या घरी एसटीने येत होती. 

सांगली आकाशवाणीजवळ त्या एसटीतून उतरल्या. रस्त्यावर पावसाचे पाणी असल्याने त्या रस्त्याच्या कडेने चालत होत्या. याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. ज्या एसटीने त्यांनी प्रवास केला त्याच एसटीने त्यांना चिरडले.

या दुर्घटनेनंतर याला सर्वस्वी बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे. बांधकाम विभाग आणि महापालिका प्रशासनाला धारेवर धरत

 आज सर्वपक्षीय कृती समितीचे तर्फे तिरडी मोर्चा काढण्यात आला. सांगलीच्या राजवाडा चौकातून हा मोर्चा बांधकाम विभाग प्रशासनावर काढण्यात आला.

या मोर्चादरम्यान मयत कुटुंबाला शासनाने आर्थिक हातभार लावावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच प्रशासन आणखी किती बळी घेणार ? या घटनेनंतर आता तरी प्रशासनाला जाग येणार का ? 

असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला सरकडून मदतीचा हात पुढे येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Post a Comment

0 Comments