google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई व केरळ उपांत्य फेरीत दुसऱ्या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींना केले मंत्रमुग्ध

Breaking News

कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई व केरळ उपांत्य फेरीत दुसऱ्या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींना केले मंत्रमुग्ध

कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई व केरळ उपांत्य फेरीत दुसऱ्या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींना केले मंत्रमुग्ध



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)



सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सुसज्ज इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या कै.गुरुवर्य चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांच्या दुस-या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली.

फाल्कन्स मुंबई, सातारा जिमखाना, सातारा, नेक्सस स्पोर्ट्स नांदेड, श्री केरला वर्मा कॉलेज थ्रिसूर, जय हिंद जिमखाना कडा, बीड, ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब सोलापूर, नागपाडा मुंबई, जीकेपी मुंबई हे संघ क्वार्टर फायनल फेरीसाठी पात्र ठरले.

आजच्या सामन्यांमध्ये एस एन.जी.नागपूर आणि लाईफ चेंजर मुंबई या यातून एस एन जी नागपूर विजयी, इंटरनॅशनल वाय एम सी ए मुंबई आणि सातारा जिमखाना, 

सातारा यातून सातारा जिमखाना विजयी तसेच सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब खारघर यादरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये सांगोला संघ विजयी झाले.

साखळी सामन्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांचे सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे माजी खेळाडू पोलीस निरीक्षक निगडी, पूणेचे महेश बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक नागरी हक्क संरक्षण सोलापूरचे सचिन वसमळे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

 यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनिअर कॉलेज त्याचप्रमाणे सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शहरातील क्रीडाप्रेमींनी सामन्यांचा आनंद लुटला.

 *चौकट* 

*उदईक रविवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून यावेळी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, विश्वविजेता भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधार प्रियंका इंगळे 

आणि संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्यासह उद्योगपती सिद्धार्थ झपके, विलास क्षीरसागर, सुहास होनराव, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, श्रीकांत देशपांडे, मंगेश म्हमाणे, रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती लाभणार आहे.* 

*या स्पर्धांकरिता प्रथम पारितोषिक रुपये ३१००० द्वितीय पारितोषिक रुपये २१०००, तृतीय पारितोषिक रुपये ११०००, चतुर्थ पारितोषिक रुपये ६००० तर पाचवे 

पारितोषिक कॉर्टर फायनल मध्ये उपविजयी झालेल्या चार संघांना प्रत्येकी रुपये ३०००, सहावे पारितोषिक साखळी सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या आठ संघांना प्रत्येकी रुपये १५००, वैयक्तिक नैपुण्याकरिता उत्कृष्ट 

खेळाडू रुपये ३०००, बेस्ट शूटर रुपये २०००, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू रुपये २००० अशा एकूण रोख रुपये एक लाखांच्या बक्षिसासह कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती चषकाने झपके कुटुंबीयांतर्फे विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.*

या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव, सचिव प्रशांत मस्के व विश्वेशजी झपके, मिलिंद अंकलगी, गणेश सपाटे आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे, नरेंद्र होनराव,

 डी.के.पाटील, अन्सार इनामदार, संतोष लवटे, सुभाष निंबाळकर, चैतन्य कांबळे, अजित मोरे, राहुल इंगोले, प्रशांत बुरांडे आदी क्रीडा विभाग कार्यरत आहे.

Post a Comment

0 Comments