आमदार रोहीतदादा पाटील यांनी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची घेतली सदिच्छा भेट
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
स्व.आर.आर.आबा यांचे सुपुत्र आमदार रोहीत(दादा) पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांची सांगोला येथे सदिच्छा भेट घेतली... लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला..
भेटी दरम्यान स्व.आबासाहेब व स्व आर.आर आबा यांच्या ऋणानुबंधावर चर्चा झाली.तसेच स्व आबासाहेबांन व स्व.आर आर आबांनी शेतीच्या पाण्यासाठी केलेले प्रयत्न यावरही सखोल चर्चा झाली.
आबासाहेब व आर आर आबा जरी वेगवेगळ्या पक्षात काम करीत असले तरी तरी विकासाच्या मुद्यावर ते एकदिलाने काम करीत होते.आसेही या दोन युवा आमदारांच्या बोलण्यातून आले.येणाऱ्या काळात
स्व.आबासाहेब व स्व आर आर आबा यांचे विचार तळागाळा पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण राजकारण बाजुला ठेवून दोघे करण्याबाबत दोंन्ही नेत्यांमध्ये एकमत दिसुन आले.
या दोन नेत्यांच्या भेटीने स्व आबासाहेब व स्व आर.आर आबा यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असल्याचे मत शेकापक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले


0 Comments