google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ..सांगोला तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking News

धक्कादायक ..सांगोला तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक ..सांगोला तालुक्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सोनलवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 

या प्रकरणी सोनलवाडीतील सुनील भिवा खरात याच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने १ सप्टेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अल्पवयीन पीडितेला मोबाईलवर मेसेज पाठवून गावातील बांधाजवळ बोलावले. 

लग्नाचे आमिष दाखवत तसेच धमकी देत तिच्यावर बळजबरीने तीन ते चार वेळा शारीरिक अत्याचार केला.

 यामुळे पीडितेला एका अर्भकाला जन्म द्यावा लागला. घटनेबाबत कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जीवे मारील अशी धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

या गंभीर प्रकारात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 64(1), 64(2)(i)(m), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियमातील कलम 4, 8, 12, 42 तसेच अ.जा. अ.ज. अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, सांगोला पोलिसांनी घटनेबाबत अधिक तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments