(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७ /९५०३४८७८१२ सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नंबर जॉईन करा)
कोळा (प्रतिनिधी): लोणारी समाजाच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्वः विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली
असून या महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती समाजातील नागरिकांनी घेऊन त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन लोणारी समाज सेवा संघाचे सांगोला तालुका अध्यक्ष संतोष करांडे यांनी केले आहे.
महामंडळात लोणारी समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांचा समावेश केलेला असून त्यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज, गट कर्ज,
यासह २० टक्के बीजभांडवल योजना व थेट कर्ज योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. या महामंडळाच्या माध्यमातून लोणारी समाजाच्या सर्व घटकांचा विकास करता येईल
अशा सर्व योजनांचा समावेश असलेलं महामंडळ राज्य सरकारने स्थापन केले आहे. समाजाच्या एकीकरणासाठी गावोगावी जावून समाजामध्ये जनजागृती करून समाज एकीकरणाचा प्रयत्न केला होता.
यानंतर लोणारी समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने १३ ऑगस्ट २०२४ पासून सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण केले होते.
या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून महामंडळाच्या राज्य स्तरावर स्व. विष्णुपंत रामचंद्र दादर (लोणारी) आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली असून सोलापूर येथे कामकाज सुरु झाले आहे.
महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत असेही आवाहन त्यांनी केले आहे. पुढे बोलताना महाराष्ट्र सरकारने लोणारी समाजाच्या धार्मिक, सामाजिक,
शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी स्व. विष्णुपंत रामचंद्र दादर लोणारी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून आम्ही यासाठी महाराष्ट्र शासनाच आभारी असल्याच संतोष करांडे यांनी सांगितले.
0 Comments