अजनाळे जि प शाळेतील दोन शिक्षकांची बदली मात्र नवीन शिक्षकांची नियुक्ती नाही ; शिक्षण विभागाचा अजब कारभार...
१ सप्टेंबर पर्यंत नियुक्ती न झाल्यास शाळेला टाळे ठोकणार; पत्रकार सचिन धांडोरे यांचा इशारा...
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/९५०३४८७८१२ सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नंबर जॉईन करा)
सांगोला; सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिन शिक्षक कार्यरत होते. त्यातील दोन शिक्षकांची नुकतीच बदली झाली आहे. परंतु त्यांच्या जागी अद्याप नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
परिणामी, शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण ८२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालक व ग्रामस्थ यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
पत्रकार सचिन धांडोरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी काल सोमवार दि २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात, १ सप्टेंबर २०२५ पर्यंत शिक्षकांची नियुक्ती
न झाल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यामुळे गट शिक्षणाधिकारी काय भूमिका घेणार याकडे पालक ग्रामस्थ यांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे शासन व शिक्षण विभाग ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवून ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवित आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळा बंद होऊ नयेत यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. परंतु अजनाळे गावातील शाळेच्या बाबतीत
मात्र शिक्षण विभागाने अजूनही शिक्षकांची नियुक्ती केली नसल्याने शिक्षण विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासनाने शिक्षण हमी कायदा लागू करून प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची हमी दिली आहे.
मात्र प्रत्यक्षात शाळेत शिक्षकच नसतील तर मुलांचे शिक्षण कसे होणार?तरी झोपलेल्या शिक्षण विभागाने त्वरित जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर शिक्षकांची नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल...
चौकट :ग्रामस्थांनी एकत्र येऊन लवकरच याबाबत मोठे आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केली असल्याचे समजते. या समस्येचे तातडीने निराकरण व्हावे, अन्यथा विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे..
0 Comments