धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण;
हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम सांगोला तालुक्यातील घटना..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ८२०८२८४६४७/ ९५०३४८७८१२ सविस्तर बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला नंबर जॉईन करा)
सांगोला:- जेवणाचे बिल मागण्याच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून वेळूच्या काठ्यांनी पिता-पुत्रांसह पुतण्याला जबर मारहाण केली.
तसेच हॉटेल मालकाचा गळा दाबला. त्यानंतर हॉटेलच्या व्हरांड्यातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल, टेबल-खुर्चाची तोडफोड करून आरोपींनी धूम ठोकली.
ही घटना गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३०च्या सुमारास सांगोला तालुक्यात मांजरी येथील हॉटेल टर्निंग पॉइंट येथे घडली.
याबाबत नारायण हरिदास शिंदे (रा. मांजरी) यांनी रविवारी फिर्याद दिली. पोलिसांनी तुषार गावडे, गणेश पांढरे, अंकुश माने,
समाधान शेळके, सुनील शेजाळ, पांडुरंग शेजाळ (सर्वजण रा. सावे), अंकुश बंडगर, निवास बंडगर व शुभम बंडगर (सर्वजण रा. शिरभावी) व इतर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी, नारायण शिंदे यांचे सांगोला-पंढरपूर रोडवरील मांजरी गावानजीक हॉटेल आहे. दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी रात्री १०:३०च्या सुमारास तुषार गावडे हा हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला.
त्यावेळी त्याने बिल देण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी व त्याच्यामध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, गुरुवारी सकाळी ११:३०च्या सुमारास फिर्यादी हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभे असताना वरील आरोपी वेळूच्या काठ्या घेऊन आले.
दोन दिवसांपूर्वी आमच्याकडून जेवणाचे बिल का मागितले म्हणत बेदम मारहाण केली. तसेच टेबल-खुर्थ्यांची तोडफोड केली.
मुलगा संदेश, सुदेश व पुतण्या वैभव सोडवण्याकरिता आले असता त्या सर्वांनी मिळून त्यांच्या हातातील काठ्यांनी मारहाण करून मोबाइल फोडून टाकले.
तसेच व्हरांड्यातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून फिर्यादीचा गळा दाबला. त्यावेळी पत्नीमध्ये आली असता त्यांना धमकी देऊन मोटारसायकलीवर बसून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments