google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना..आधी भूकंपाचे सौम्य धक्के अन् आता गूढ आवाजानं सांगोला हादरला; लौक हैराण, धोक्याची घंटा?

Breaking News

खळबळजनक घटना..आधी भूकंपाचे सौम्य धक्के अन् आता गूढ आवाजानं सांगोला हादरला; लौक हैराण, धोक्याची घंटा?

खळबळजनक घटना..आधी भूकंपाचे सौम्य धक्के अन् आता गूढ आवाजानं सांगोला हादरला; लौक हैराण, धोक्याची घंटा?


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला शहर आणि तालुका बुधवारी ९ एप्रिलला दुपारी ३.५३ मिनिटांनी प्रचंड गूढ आवाजाने पुन्हा हादरला. या आवाजामुळे घरे हादरली,

 घरावरील पत्रे, खिडक्या, तावदाने थरथरली. सांगोल्यात गुरुवार ३ एप्रिलला सकाळी ११.२२ मिनिटांनी

 २.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे काही क्षणांसाठी सौम्य धक्केही जाणवले होते.ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी प्रचंड गूढ आवाजाने सांगोला हादरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुष्काळी सांगोला तालुका हा आवर्षण प्रक्षेत्रात येत असून पर्जन्यमान कमी राहते. मागील ४-५ वर्षापासून सांगोला शहर, तालुक्यात अधून मधून प्रचंड गूढ आवाज येत आहेत. अनेकांनी हा आवाज फायटर विमानाचा आहे

 तर भूगर्भात लावारस तयार झाल्यामुळे त्याचा उद्रेक होऊन असे गूढ आवाज होतात असे वेगवेगळे तर्क लावले आहेत. परंतु आतापर्यंत प्रशासनाला नेमका कुठून आणि कशाचा प्रचंड गूढ आवाज होतोय याचा शोध घेता आला नाही.

३१ मार्च रोजी एकामागून एक असे सलग २ वेळा प्रचंड गूढ आवाज आल्यामुळे सांगोला शहर व तालुका हादरला होता. त्यानंतर गुरुवारी ३ एप्रिलला सकाळी ११.२२ मिनिटांनी

 सांगोल्यात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला तर बुधवारी ९ एप्रिलला परत प्रचंड गूढ आवाज झाला आहे त्यामुळे नागरिकांसाठी चर्चेचा विषय बनला आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, सांगोल्यात सतत होणारे प्रचंड गूढ आवाज, भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे सांगोला तालुका भूकंपाचा केंद्रबिंदु तयार झाला असेल तर ही सांगोल्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

 सतत होणाऱ्या गूढ आवाजामुळे प्रशासनाची नेमकी भूमिका काय हा संशोधनाचा विषय आहे.

Post a Comment

0 Comments