सांगोला पोलीस यांची उल्लेखनीय कामगिरी, मंगळसूत्र चोरणाऱ्याला केले अटक
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला - सांगोला पोलीस ठाणे येथे दि.१५ ऑक्टोंबर रोजी फिर्यादीला मारहाण करून फिर्यादीच्या पत्नीच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र
हे जबरदस्तीने चोरी केली असल्याची गुन्हा अनोळखी इसमा विरुद्ध दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा गुन्हा सांगोला पोलिसांनी उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलिसांनी सदर गुन्हा यातील आरोपी बाबत काही माहिती नसताना गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हा उघडकीस
आणुन आरोपी योगीराज संजय मोहोटकर, वय-२४ वर्षे, रा.ठी.बुध, ता.खटाव, जि.सातारा यास दि.८ नोव्हेंबर रोजी अटक करून न्यायालयात हजर केले
असता आरोपीस पोलिस कोठडी सुनावण्यात आली असुन आधिक तपास चालु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपुजे,
सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.भारत वाघे, पोह.ढेरे, पोना.लेंगरे व सायबर सेलचे पोह.तांबोळी यांनी केली.


0 Comments