google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Breaking News

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा!


भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

सोलापूर : घराचे बांधकाम सुरु असताना शेजारच्याशी झालेले भांडण मिटविण्यासाठी जुळे सोलापुरातील एका कुटुंबाने ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून घेतले.

 त्याचा फायदा उठवत राठोडने डिसेंबर २०२४ ते ऑगस्ट २०२५ या काळात सतत जबरदस्तीने अत्याचार केले.

पीडितेच्या फिर्यादीवरून राजेंद्र देविदास राठोड याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राठोड हा सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक आहे.

एक वर्षापूर्वी पीडितेने शेजारच्याशी झालेले भांडण मिटविण्यासाठी ओळखीच्या राजेंद्र राठोड यास बोलावून घेतले. तो गावात भांडण मिटविण्याचे काम करतो 

असे पीडितेच्या कुटुंबाने ऐकले होते. त्याने शेजारच्याविरुद्ध विजापूर नाका पोलिसांत फिर्याद द्यायला लावली. त्यानंतर एकेदिवशी पोलिस आयुक्तालयात तक्रार अर्ज द्यायचे म्हणून बोलावून घेतले.

 अर्ज देऊन आल्यावर घरी जाताना राठोड याने त्याच्या चारचाकीत बोलावून घेतले.

 त्यानंतर पाणी प्यायला दिले आणि गाडीतच गुंगी आली. जाग आल्यावर गाडी सिद्धेश्वर कारखान्याजवळील मोकळ्या मैदानात होती. 

त्याठिकाणी कोणी नसल्याची संधी साधून त्याने जबरदस्तीने अत्याचार केला. फोटो, व्हिडिओ काढले. ते सोशल मिडियावर व्हायरल करतो 

म्हणून सतत अत्याचार केले. कामानिमित्त मुंबईला गेल्यावर त्याठिकाणी देखील अत्याचार केले.

प्रत्येक पौर्णिमेला अक्कलकोटला जात असल्याची माहिती काढून त्याने एकदा गाडीत बसवून नेले

 आणि गाणगापूर रोडवरील लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्यानंतर सतत पतीची नोकरी घालवतो, मुलांना ठार मारतो, 

फोटो, व्हिडिओ व्हायरल करतो म्हणूनही अत्याचार केले. ही बाब पतीला समजली आणि पीडितेच्या संसारात वितुष्ट आले.

 त्यानंतर त्याने पतीविरुद्ध देखील पोलिसांत फिर्याद द्यायला लावली, असेही पीडितेने पोलिसांना सांगितले.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी राजेंद्र राठोडचा शोध घेतला, पण तो सध्या पसार झाला आहे. 

पोलिस त्याचा शोध घेत आहेत. सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments