सांगोला तालुक्यातील नाझरे बंधारा येथील गळती बंद करा अशी शेतकरी वर्गातून मागणी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
गोला - नाझरे ता.सांगोला येथील मान नदीवरील बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया जात असून, अद्याप दरवाजे न बसवल्याने व त्याची गळती सुरू
असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.त्यामुळे ताबडतोब दरवाजे टाकून गळती बंद करा व बंधाऱ्याची दुरुस्ती करा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.
नाझरे, वझरे, बलवडी या परिसरासाठी हा बंधारा बांधला आहे. आसपासच्या बंधाऱ्याचे दरवाजे टाकले आहेत.
परंतु नाझरे येथील दरवाजे न बसवल्याने व गळती न रोखल्याने पाणी दरवाजा मधून चिळकांड्या मारीत आहे.
त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तसेच दरवाजे न टाकल्याने पाऊस पडून उपयोग काय असा प्रश्न शेतकरी वर्गात केला जात आहे.


0 Comments