सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत अॅड. शहाजीबापू पाटील
व आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आघाडी करून एकत्र निवडणूक लढवावी;
सांगोला शहरातील शिवसेना शिंदे गट व शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी
सांगोला : सांगोला नगरपालिकेचे निवडणूक जाहीर झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असताना कुठल्या पक्षाची कोणासोबत आघाडी होते व कुठला गट कोणाबरोबर जातो यावरतीच नगरपालिकेवर सत्ता कोणाची? ठरणार असल्यामुळे आज अर्ज भरण्याचा पहिला दिवस असताना पर्यंत तरी कुठलीच युती वा आघाडी
झाल्याचे स्पष्ट झालेले नाही, परंतु सांगोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते भाई स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख व माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांना मानणारा मोठा वर्ग
सांगोला शहरात असून यापूर्वी देखील अनेक वेळा अॅड. शहाजीबापू व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आघाडी करून निवडणूक लढवलेले आहेत, अॅड. शहाजीबापू पाटील व गणपतराव देशमुख हे एकमेकांचे कट्टर विरोधक जरी असले
तरी दोघांमध्ये कधीही मनभेद किंवा वैचारिक वाद कधीच नव्हता त्यामुळे निवडणुकीपुरते राजकारण व इतर वेळी एकमेकांस पुरक राजकारण नेहमीच स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि अॅड. शहाजीबापू पाटील यांनी केलेले आहे. स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या निधना नंतर होणारी
ही नगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख कोणासोबत आघाडी करणार? की स्वबळावर लढणार हे अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नसले तरी स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि
अॅड. शहाजीबापू पाटील यांचे सांगोला शहरातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते मात्र अॅड. शहाजीबाप पाटील व डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन आघाडी करून निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी करीत आहेत.
सांगोला शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सांगोला शहरात सुरू असलेली प्रलंबित कामे पूर्ण होऊन शासनाकडून भरगच्च निधी येण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री व ज्यांच्याकडे नगर विकास खात्याचा कारभार आहे ते एकनाथ शिंदे यांचेशी
माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांचे संबध खासम खास असल्याने व अॅड. शहाजीबापू पाटील हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणात देखील लोकप्रिय झालेले असल्याने या सर्व गोष्टीचा फायदा सांगोला शहराच्या विकासा साठी होईल.
आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी देखील या सर्व गोष्टींचा विचार करून अॅड. शहाजीबापू पाटील यांच्याबरोबर आघाडी करून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा शेकाप व अॅड. शहाजीबापूंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
राजकारणात कोण कोणाचा कायम शत्रू अथवा मित्र राहत नसल्याने तसेच स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी देखील माजी आमदार अॅड. शहाजीबापू पाटील यांच्याशी कायमच एक जिव्हाळयाचे नातं जपले
असल्यामुळे या सर्वाचा विचार करूनच अॅड. शहाजीबापू व आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी एकत्र निवडणूक लढवल्यास त्याचा मोठा फायदा शहराच्या विकासाला होईल असे देखील मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
या सर्व बाबींमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणाचा हा कळीचा मुद्दा असल्याने यावर देखील दोन्ही नेत्यांनी बसून चर्चा करून मधला मार्ग काढून काही अडचणी असतील तर दुर कराव्यात. काही प्रभागात जिथे एकमेकांचे उमेदवार आहेत तिथे समन्वयाची भूमिका घेऊन
शेतकरी कामगार पक्ष व अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेची आघाडी होऊन एकत्र निवडणूक लढवावी अशी अपेक्षा सांगोला शहरातील आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे व अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.


0 Comments