google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...'अखेर महूदमधील मुख्य चौकाने घेतला मोकळा श्‍वास'; पोलिस प्रशासनाकडून चौकातील अतिक्रमणांवर कारवाई; वाहतूक सुरळीत

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...'अखेर महूदमधील मुख्य चौकाने घेतला मोकळा श्‍वास'; पोलिस प्रशासनाकडून चौकातील अतिक्रमणांवर कारवाई; वाहतूक सुरळीत

ब्रेकिंग न्यूज...'अखेर महूदमधील मुख्य चौकाने घेतला मोकळा श्‍वास';



पोलिस प्रशासनाकडून चौकातील अतिक्रमणांवर कारवाई; वाहतूक सुरळीत

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महूद : दोन महामार्ग होऊनही महूदमधील चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे महूद ग्रामस्थ कमालीचे त्रासले असून, प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करावी;

 अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.याबाबत सोमवारी (ता. १०) 'सकाळ'मध्ये प्रकाशित होताच 

पोलिस प्रशासनाने महूद येथील मुख्य चौकात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढून टाकली आहेत. 

त्यामुळे काही अंशी चौकाने मोकळा श्वास घेतला असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

जत ते इंदापूर हा राष्ट्रीय महामार्ग तर पंढरपूर ते मल्हारपेठ हा राज्य महामार्ग अशा दोन महामार्गांवरील चौकाच्या ठिकाणी असणाऱ्या 

सांगोला तालुक्यातील महूद येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहने तासन्‌तास अडकून पडत आहेत.

 शेकडो कोटी रुपये खर्च करून पंढरपूर ते मल्हारपेठ या राज्य महामार्गाचे काम करण्यात आले. 

हे काम करताना नियमाप्रमाणे रस्त्याचे रुंदीकरणच झालेले नाही. हीच अवस्था जत ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत झाली आहे. नियमापेक्षा कमी रुंदीचे महामार्ग बनविण्यात आले आहेत.

कागदोपत्री महामार्ग असलेल्या या महामार्गावरून फार मोठी अवजड वाहतूक सुरू आहे. त्यातच महूद हे वीस हजारहून अधिक लोकसंख्येचे गाव असून, 

परिसरातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्यांचे मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे. 

येथील मुख्य चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे झालेल्या अपघातात आजपर्यंत असंख्य नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत.

याबाबतची बातमी 'सकाळ'मध्ये प्रकाशित होताच चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या

 मार्गदर्शनाखाली मोठा फौजफाटा येथील मुख्य चौकात दाखल झाला. मुख्य चौक आणि परिसरामध्ये वाहतुकीस अडथळा करणारे बोर्ड,

 दुकानदारांची अतिक्रमणे यासह सर्व प्रकारचे अडथळे जेसीबी लावून काढून टाकण्यात आले आहेत. 

वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

यामुळे येथील मुख्य चौकाने मोकळा श्वास घेतला असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे, सहायक पोलिस निरीक्षक भारत वाघे,

 कल्याण लुबाळ यांच्यासह पोलिस कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत सर्वसामान्य ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, ही कार्यवाही यापुढेही चालू राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महूद चौकात बॅनर युद्ध

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचे वाढदिवस यासह अनेक कारणांसाठी येथील मुख्य चौकात नेहमीच मोठ्या प्रमाणावर बॅनर लावलेले असतात. 

त्यासाठी अगदी मुख्य चौकात अतिक्रमण करून वाहतुकीस अडथळा होईल अशा प्रकारे हे बॅनर उभे केले जातात. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभांमध्ये अनेक वेळा हा विषय मांडला होता.

 ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत बॅनर उभा करणाऱ्या ठेकेदारांना अनेक वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत;

 मात्र ठेकेदार अशा नोटिसांना न घाबरता अतिक्रमण करून बॅनर उभे करतच आहेत.

Post a Comment

0 Comments