संतापजनक घटना ! 'टेंभुर्णीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार';
साेलापुर जिल्ह्यात खळबळ, व्हिडिओ काढून मारहाण अन्..
टेंभुर्णी : एका अल्पवयीन मागासवर्गीय निर्भयावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्याचा व्हिडिओ काढून मारहाण, विनयभंग केल्या प्रकरणी पाच जणांविरोधात
टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पोक्सो व ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मे २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ही घटना घडली आहे.
याविषयी टेंभुर्णी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, मे २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या दरम्यान संशयित आरोपी निखिल सुधीर लांडगे
(रा.दहिवली ता. माढा) याने पीडितेचा पाठलाग करून पीडिता अल्पवयीन असल्याचे माहीत असताना ही तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला.
तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण केली. संशयित आरोपी अमोल गरड, शाहीद मुलाणी
(दोघे रा. उपळवाटे, ता.माढा) तसेच संशयित अजिंक्य संगीतराव (रा.टेंभुर्णी, ता.माढा) व तात्या शामराव जगताप (रा.दहिवली, ता.माढा)
यांनी निखिल लांडगे याच्या सोबत येऊन पिडीतेस रस्त्यावर अडवून विनयभंग करत जातिवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तथा आयपीएस अंजना कृष्णा व्ही.एस. या करीत आहेत.


0 Comments