google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी! धवलसिंह मोहिते पाटील सहकुटुंब अजित पवारांच्या भेटीला, सोलापूर जिल्ह्यात दादांच्या गळाला मोठा मोहरा लागल्याची चर्चा

Breaking News

मोठी बातमी! धवलसिंह मोहिते पाटील सहकुटुंब अजित पवारांच्या भेटीला, सोलापूर जिल्ह्यात दादांच्या गळाला मोठा मोहरा लागल्याची चर्चा

मोठी बातमी! धवलसिंह मोहिते पाटील सहकुटुंब अजित पवारांच्या भेटीला, सोलापूर जिल्ह्यात दादांच्या गळाला मोठा मोहरा लागल्याची चर्चा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोलापूर : एका बाजूला अजित दादांचे  जुने शिलेदार त्यांची साथ सोडून भाजपमध्ये सामील होत असताना

 आज अजितपवारयांच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 

राज्याचे माजी सहकार मंत्री कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी

 आज सकाळी पुणे  येथे अजित दादांची भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्यात दादांच्या गळाला मोठा मोहरा लागण्याची शक्यता आहे.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणती भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 

आज डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या मातोश्रीसह अजित दादांची पुणे येथील कार्यालयात भेट घेतल्याने अजितदादा गटाला ही दिलासादायक बातमी समोर येत आहे.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे असून जिल्ह्यात त्यांचा स्वतःचा एक गट कार्यरत आहे. 

जनसेवा संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी काम करीत असल्याने अकलूज नगरपालिकेसह जिल्ह्यातल्या इतर ठिकाणीही 

डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांचा फायदा अजित दादा गटाला होणार आहे. 

आज सकाळी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि अजित दादांची झालेली भेट यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपलाही धक्का बसला आहे.

भाजपकडून डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षप्रवेश देण्याचे प्रयत्न पडद्याडून सुरू होते.

 मात्र डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी थेट अजितदादांची भेट घेतल्याने ते लवकरच 

अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

याबाबत अद्याप डॉ.धवलसिंह यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या जनसेवा संघटनेत मात्र उत्साहाचे वातावरण आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने  आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी  जोरदार तयारी सुरू केली आहे. 

पुणे येथील पक्ष कार्यालयात स्वतः अजित पवार यांच्या उपस्थितीत इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. वृत्तानुसार, 

'अजित पवार पुण्यातल्या पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत आणि नगरपरिषदेसंदर्भातील मुलाखती त्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.

' या मुलाखतींमुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

 यासोबतच, अजित पवारांच्या उपस्थितीत काही नवीन पक्षप्रवेश होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे, ज्यामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होऊ शकतो.

Post a Comment

0 Comments