google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...लेकराच्या मृत्यूने आई-वडील खचले; दु:ख सहन होत नसल्याने घरात नको ते करून बसले; सांगोल्यात धक्कादायक घटना

Breaking News

खळबळजनक...लेकराच्या मृत्यूने आई-वडील खचले; दु:ख सहन होत नसल्याने घरात नको ते करून बसले; सांगोल्यात धक्कादायक घटना

खळबळजनक...लेकराच्या मृत्यूने आई-वडील खचले; दु:ख सहन होत


नसल्याने घरात नको ते करून बसले; सांगोल्यात धक्कादायक घटना

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात हातीद येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून वृद्ध दाम्पत्याने आपलं जीवन संपवलं आहे.

 चार वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात मुलाचा मृत्यू झाल्याने दुःखात असलेल्या वामन महादेव घाडगे

 (62) आणि अनिता वामन घाडगे (55) यांनी राहत्या घरी लोखंडी अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी वामन घाडगे यांचा लाडका मुलगा आकाश याचा बंगळुरू येथे एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 

या घटनेनंतर वामन आणि अनिता घाडगे हे दोघेही खूप खचले होते. मुलाच्या अकाली मृत्यूचं दुःख त्यांना सहन होत नव्हतं

 आणि ते सतत त्याच्या आठवणीत रडत असत. चार वर्षांपासून वामन घाडगे आणि अनिता घाडगे हे वृद्ध दाम्पत्य कसेबसे आयुष्य जगत होते. लाडक्या आकाशचा अकाली मृत्यू त्यांना सहन होत नव्हता.

सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास, त्यांचे मोठे चिरंजीव विकास वामन घाडगे हे ग्रामपंचायतीच्या कामासाठी बाहेर गेले होते.

 त्यांची पत्नी, म्हणजेच मोठी सून स्वाती घाडगे या चुलत्यांकडे गेल्या होत्या. घरात कोणी नसल्याचं पाहून, वामन आणि अनिता घाडगे यांनी टोकाचं पाऊल उचललं. 

विकास घरी परतल्यावर त्याने स्वयंपाकघराचे दोन्ही दरवाजे आतून बंद असल्याचे पाहिले. खिडकीतून डोकावल्यावर त्याला धक्काच बसला. त्याचे आई-वडील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत दाम्पत्याचे 

सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण हातीद गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments