google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना नविन स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार - आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख

Breaking News

सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना नविन स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार - आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख

सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना नविन स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार -


आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख
 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३० अंगणवाडी केंद्रांना एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर 

करणेसाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यासाठी प्रति अंगणवाडी १,६४,५६० रूपये मिळणार असून 

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळाले असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अंगणवाडी केंद्रांना निधी मिळणार असून, 

यामुळे मतदारसंघातील अंगणवाडी केद्रांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा विकास होणार आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पुर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात. 

याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतरीत होणार 

असून सदर केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी वातावरणात पूर्व शालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येईल. 

तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षित देण्यात येणार आहे. 

याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारुन व त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये वाढ करुन त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये 

रुपांतरीत करण्यासाठी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी महिला व बालविकास मंत्री मा.ना.अदिती तटकरे यांच्याकडे सतत या निधी संदर्भात पाठपुरावा केला होता. 

त्यांच्या या प्रयत्नांमुळे सदरच्या अंगणवाडी केंद्रांना निधी उपलब्ध झाला असून सदरच्या अंगणवाडी केंद्राच्या पायाभूत सुविधेत वाढ होणार आहे.

सदरचा निधी सांगोला विधानसभा मतदार संघासाठी मंजूर केल्याबद्दल आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,

 उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे  यांचे विशेष आभार मानले.

Post a Comment

0 Comments