ब्रेकिंग! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे राज्यातील सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना महत्त्वाचे आदेश
राज्यातील महसूल विभागाचे काम अधिक सक्षमपणे आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून व्हावे यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी
राज्यभरातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना स्पष्ट आणि कठोर आदेश दिले आहेत. काल झालेल्या ऑनलाईन बैठकीत तब्बल ५२५ अधिकारी सहभागी झाले होते.
प्रत्येक तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी जनतेला भेटण्यासाठी निश्चित वेळ ठरवावी आणि तो वेळ स्पष्टपणे कार्यालयाबाहेर फलकावर लिहावा.
नागरिकांची कामे प्राधान्याने व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महसूलमंत्री बावनकुळे त्यांनी दिला.
कोणत्याही अधिकाऱ्याची बदली आमदारांच्या शिफारशीनुसार केली जाणार नाही
महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही अधिकाऱ्याची बदली आमदारांच्या शिफारशीनुसार केली जाणार नाही. महसूल खाते कोणत्याही राजकीय दबावाखाली काम करणार नाही.
फक्त कामगिरीच्या आधारेच निर्णय घेतले जातील. १५ ऑगस्ट रोजी उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. विधिमंडळात त्यांच्या कार्याची प्रशंसा करणारा ठराव मांडला जाईल, असेही बावनकुळे म्हणाले.
प्रत्येक तहसीलदाराने पांदण रस्त्यांबाबतचा अहवाल महसूल मंत्रालयात पाठवावा
३० जून पर्यंत प्रत्येक तहसीलदाराने पांदण रस्त्यांबाबतचा अहवाल महसूल मंत्रालयात पाठवावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियानात महसूल विभागाने पूर्ण सहभाग घ्यावा. या अभियानाअंतर्गत १६०० शिबिरे वर्षभरात आयोजित केली जाणार आहेत.
वाळू वितरणात पारदर्शकता
बावनकुळे यांनी सांगितले की, वाळू गरिबांना घरकुलासाठी सहज उपलब्ध झाली पाहिजे. राज्यात २० लाख घरकुलांची योजना आहे. त्यामुळे वाळू वितरणात कोणतीही कामचुकारपणा किंवा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.
0 Comments