सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंती निमित्त गदा पूजन
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- युगानीयुगे ज्या मारुतीरायांचे शौर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ती त्यांची गदा,
ज्याने बलाढ्य असुर आणि राक्षसांचा संहार करून प्रभू श्रीरामचंद्रांच्या रामराज्याच्या कार्यात योगदान दिले.
महाभारताच्या युद्धात देखील मारुतीराया अर्जुनाच्या रथावर सुक्ष्मातून विराजमान होऊन पांडवांना धर्मयुद्ध जिंकण्यात साहाय्य केले. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी ही समर्थ रामदास स्वामींनी 11 मारुतींची स्थापना
करून मावळ्यांकडून बलोपासना करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या कार्याला बळ मिळवून दिले.
आज पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी आपल्याला मारुतीरायांची आणि त्यांच्या शौर्यरुपी आशीर्वादाची आवश्यकता आहे.
हाच उद्देश ठेवून शनिवार, 11 एप्रिल या दिवशी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री अंबिका देवी मंदिर येथे गदा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गणपत पटेल, अजय तेली, श्रेयश तोडकरी, बिरुदेव आगलावे, रुद्रेश स्वामी, भिमाराम चौधरी, डॉक्टर मानस कमलापूरकर, तनसुख पटेल, अमर गुळमिरे सर उपस्थित होते.
प्रारंभी नामजप, मारुतीस्रोत म्हणून घेण्यात आले. त्यानंतर नेहा कावळे आणि नवनाथ कावळे यांनी गदा पूजन केले.
शंखनाद श्रेयश कावळे, हिंदू राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा दुर्गेश कावळे यांनी घेतली. सूत्रसंचालन संतोष पाटणे सर यांनी केले.
0 Comments