धक्कादायक..! सासरच्या जाचाला कंटाळून विष पिऊन विवाहितेची आत्महत्या;
नवरा, आजी, सासू, नवऱ्याच्या मामासह चौघांवर सांगोला पोलीस मध्ये गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला सासरकडील लोकांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवरा,
आजी, सासू, नवऱ्याच्या मामासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास सांगोला तालुक्यात हतीद येथे घडली.
श्रावणी अनिकेत मंडले असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत, मनीषा तानाजी चव्हाण (रा. मणेराजुरी, ता. तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अनिकेत राजू मुंडले, अबुताई सुभाष चव्हाण, सोमा सुभाष चव्हाण व नेताजी सुभाष चव्हाण (सर्वजण रा. हातीद, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीची मुलगी श्रावणी हिचा जून २०२३ मध्ये हातीद येथील अनिकेत राजू मंडलेसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर दाम्पत्यास एक अपत्य झाले होते.
लग्नानंतर श्रावणीस दोन-तीन महिने व्यवस्थित नांदवले त्यानंतर तिला पतीचे दोन्ही मामा, आजी असे मिळून त्रास देऊन मारहाण करीत होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास फिर्यादीच्या मोबाइलवर जावई अनिकेत यांनी फोन करून श्रावणी हिने विष प्राशन केले असून श्रावणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
0 Comments