google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले तिन्ही कुटुंबे सुखरूप तहसीलदारांची माहिती : पर्यटक नातेवाईकांचा संपर्क

Breaking News

सांगोला तालुक्यातील काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले तिन्ही कुटुंबे सुखरूप तहसीलदारांची माहिती : पर्यटक नातेवाईकांचा संपर्क

सांगोला तालुक्यातील काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले तिन्ही कुटुंबे सुखरूप तहसीलदारांची माहिती : पर्यटक नातेवाईकांचा संपर्क


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला : सांगोला शहरातील तीनही कुटुंबे व तालुक्यातील बुद्देहाळ येथील चौघेजण जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते ते सर्वजण सुखरूप आहेत. 

सांगोला शहरातील तिन्ही कुटुंब आज रात्री झेलम एक्स्प्रेसने परतीच्या प्रवासाला निघणार आहेत तर बुद्देहाळमधील चौघेजण आणखी चार दिवस श्रीनगर लडाख, दोडामार्गे परिसरात पर्यटनासाठी थांबणार असल्याचे नातेवाईकांकडून सांगितले.

सांगोला कोष्टी गल्ली येथील राजकुमार वसंत दौंडे व गीता राजकुमार दौडे पती पत्नी व विद्यानगर येथील राजेश व्यंकटेश वालवडकर 

पत्नी मनीषा राजेश वालवडकर तसेच राजकुमार दौंडे यांची इचलकरंजी येथील भगिनी सुप्रिया सचिन हवळ, सचिन भाऊसाहेब हवळ व करुणा सचिन हतळ असे तीन कुटुंब ११ एप्रिल रोजी दौंड 

मधून झेलम एक्सप्रेसने तीन दिवस प्रवास करत जम्मूला पोहोचले. तिथून वैष्णवी देवी कटरा येथे गेले त्यानंतर १४ एप्रिल रोजी काश्मीर, श्रीनगर, पहलगाम,

 गुलमर्ग, सोनमर्ग पेड की गिली, चिकोटी, दूध पत्री निसर्ग रम्य ठिकाणे पाहून श्रीनगर मधील चार गार्डनसह अवंतीपुरा पर्यटन केले. मंगळवारी दुपारी ४:३० च्या सुमारास रूमवर आल्यावर टीव्हीवर पहलगाममध्ये

 पर्यटकांवर अतिरेकी हल्ल्याची बातमी पाहताना आम्हा कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली मात्र सुदैवाने हल्ल्याचे ठिकाण आमच्यापासून सुमारे ३० कि.मी. अंतरावर असल्यामुळे आम्ही सुखरूप होतो

 असे राजकुमार दौंडे यांनी सांगितले. तसेच सांगोला तालुक्यातील बुद्देहाळ येथील विजय सदाशिव लवटे, चंद्रकांत बाजीराव लवटे, वैभव बाजीराव लवटे,

काश्मिर येथे पर्यटनाला गेलेले सांगोला तालुक्यातील सुखरूप असलेली कुटुंबे.

अजय न्यानो लवटे असे चौघेजण मिळून १६ एप्रिलला दौंडमधून जम्मू-काश्मीरला पर्यटनासाठी गेले आहेत. घटनेचे ठिकाण त्यांच्यापासून ५० किमी अंतरावर असल्याने ते सुखरूप आहेत.

 सध्या ते श्रीनगर, लडाख दोडा परिसरात विविध ठिकाणी पर्यटन करत असून चार दिवसांनंतर घरी परतणार असल्याचे नातेवाईक संतोष लवटे यांनी सांगितले.

- जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेलेल्या सांगोल्यातील तिन्ही कुटुंबांशी सांगोला तहसील कार्यालयाकडून संपर्क झाला

 असून सर्वजण सुखरूप आहेत. श्रीनगरकडून जम्मू येथून बुधवारी रात्री ११ वाजता झेलम - पुणे एक्स्प्रेसने सर्वजण परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.

संतोष कणसे, तहसीलदार, सांगोला

Post a Comment

0 Comments