google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या मालती गायकवाड यांची बिनविरोध निवड माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते नूतन सरपंचाचा सत्कार

Breaking News

मोठी बातमी...लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या मालती गायकवाड यांची बिनविरोध निवड माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते नूतन सरपंचाचा सत्कार

मोठी बातमी...लोणविरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दिपकआबा गटाच्या मालती गायकवाड यांची बिनविरोध निवड


माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याहस्ते नूतन सरपंचाचा सत्कार 

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी लोणविरे ता सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाच्या सौ मालती अजित गायकवाड यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. 

निवडीनंतर सौ. मालती गायकवाड यांचा माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. जवळा ता सांगोला येथे हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी अजित गायकवाड,

 सुनील पाटील, प्रवीण कुमार, सुभाष गायकवाड, लक्ष्मण मोरे, अशोक दोडके, रमेश गायकवाड, वैभव गायकवाड, दत्तात्रय मोरे, बाळासाहेब गायकवाड, तानाजी गाडेकर, चंद्रकांत गायकवाड आदीसह कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

लोणविरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक दोडके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. 

गतवेळी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या विचारांच्या स्थानिक आघाडीने एकत्र येऊन ही निवडणूक जिंकली होती.

 स्थानिक पातळीवर नेत्यांनी केलेल्या राजकीय तरतुदीनुसार सदरची सरपंच निवड करण्यात आली आहे. सध्या सरपंच पदी निवड झालेल्या सौ मालती अजित गायकवाड यांनी सुरुवातीला अडीच वर्षे उपसरपंच म्हणून काम पाहिले होते. 

नूतन सरपंच सौ मालती गायकवाड यांच्या सत्कार समारंभात बोलताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, लोणविरे गाव हे साळुंखे पाटील परिवारावर प्रेम करणारे गाव आहे.

 या गावातील नागरिकांच्या विश्वासास सदैव पात्र राहून लोणविरे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण बांधील राहणार आहोत. 

गावाच्या विकासासाठी विविध योजनातून निधी मिळावा म्हणून शासन दरबारी आपण पाठपुरावा करू आणि गावातील वर्षांनुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी

 लावण्यासाठी नूतन सरपंच उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्यांना मदत करू असा विश्वासही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी उपस्थित सरपंच व ग्रामस्थांना दिला.

Post a Comment

0 Comments