खळबळजनक...लोटेतील विनती ऑरगॅनिक्स चोरी मधील
सांगोल्यातील आणखी एकास अटक अद्याप एक फरार, सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश.
खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील विनती ऑरगॅनिक्स कंपनी स्टोअरच्या गोडावूनमध्ये १४ एप्रिल सायंकाळी १५ एप्रिल सकाळी साडेनऊ च्या दरम्यान चोरी झाली होती.
या चोरीतील तीन संशयिता पैकी एकास अवघ्या २४ तासात पोलिसांनी अटक केले होते
आणि काही मुद्देमाल जप्तही केला होता. मात्र दोघे जण फरार होते. आणखी एकास चिपळूण येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे आणि उर्वरित मुद्देमालासह शंभर टक्के मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लोटे औद्योगिक वसाहती मधील विनती ऑरगॅनिक लिमिटेड या कारखान्याच्या स्टोअरच्या गोडाऊन मधील २ लाख ७२ हजार ६४६ रुपये ८२ पैसे इतक्या मुद्देमालाची चोरी होती.
खेड पोलीस ठाण्यात अमित तुळशीराम गायकवाड (वय - ३२, मूळ रा. कापडी, ता. पोलादपूर, जि. रायगड, सध्या रा. नवी मुंबई, ऐरोली ) , दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय-२४) व मारुती विलास गवळी
(वय-२०, दोन्ही रा. नरळेवस्ती, खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशा तिघां आरोपींविरोधात द १५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १:३७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता..
यापैकी अमित तुळशीराम गायकवाड याला . १५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:५० वाजता अटक करण्यात आली होती. तर दत्तात्रय शिवाजी गोडसे व मारुती विलास गवळी हे दोघे फरार होते.
या उर्वरित दोन पैकी दत्तात्रय शिवाजी गोडसे वय २४ राहणार सांगोला यासही चिपळूण येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे आणि उर्वरित मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे.
अशा तऱ्हेने कारखान्यातील चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. अद्याप एक जण फरार असून त्यालाही लवकरच पकडून अटक केली जाईल
असे पोलीस सूत्रांकडून आले.या चोरीच्या घटनेचा अधिक तपास खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड करीत आहेत
0 Comments