google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! मला माफ करा, माझ्यात...; प्रसुती ८ दिवसांवर, गर्भवती महिलेनं फेट्याद्वारे अँगलला गळफास घेऊन आयुष्य संपवलं, सांगोला तालुक्यात हळहळ

Breaking News

धक्कादायक! मला माफ करा, माझ्यात...; प्रसुती ८ दिवसांवर, गर्भवती महिलेनं फेट्याद्वारे अँगलला गळफास घेऊन आयुष्य संपवलं, सांगोला तालुक्यात हळहळ

धक्कादायक! मला माफ करा, माझ्यात...; प्रसुती ८ दिवसांवर,


गर्भवती महिलेनं फेट्याद्वारे अँगलला  गळफास घेऊन आयुष्य संपवलं, सांगोला तालुक्यात हळहळ

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला:- चिठ्ठी लिहून नऊ महिन्यांच्या गरोदर मातेने फेट्याच्या साह्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

ही घटना सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास गायगव्हाण, ता. सांगोला येथील टकले वस्ती येथे घडली.

रुक्मिणी सूरज टकले (वय २१ रा. गायगव्हाण, ता. सांगोला) असे मृत गरोदर मातेचे नाव आहे. 

याबाबत पती सुरज सीताराम टकले यांनी पोलिसांत खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

रुक्मिणी यांचा १७ मार्च २०२४ रोजी गायगव्हाण येथील सुरज टकले याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर रुक्मिणी सासरी नादत असताना ९ महिन्यांची गरोदर माता होती.

डॉक्टरांनी येत्या दि. २९ एप्रिल रोजी प्रसूतीची तारीख दिली होती. दरम्यान, रविवारी रुक्मिणी हिने मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली

 आणि दुपारी ३ च्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लाल रंगाच्या फेट्याने गळफास घेतला.

दरम्यान, घरातील नातेवाइकांनी तिला जेवण्यासाठी बेडरुमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही

 म्हणून दीर स्वप्नील टकले यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळफास घेतल्याचे दिसले.

या घटनेची माहिती माहेरी रुक्मिणीचा भाऊ अमोल माने, पोलिसपाटील विद्या कांबळे व तिचा नवरा सुरज टकले यास दिली. 

सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला.

Post a Comment

0 Comments