Breaking News

'अमेरिकेची कन्या कशी झाली सांगोला तालुक्यातील कटफळ गावची सून'?; 'तिने' देशांच्या सीमा ओलांडल्या अन्..

'अमेरिकेची कन्या कशी झाली सांगोला तालुक्यातील कटफळ गावची सून'?; 'तिने' देशांच्या सीमा ओलांडल्या अन्..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

महूद : प्रेमाला जात, धर्म, देशांच्या सीमा असे कुठलेही बंधन नसते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. सांगोला तालुक्यातील कटफळ हे मूळ गाव असणाऱ्या तरुणाने अमेरिकेतील 

ओरेगॉन राज्यातील डॉक्टर मुलीबरोबर नुकताच पाचगणी येथे विवाहाची रेशीमगाठ बांधली.त्यामुळे अमेरिकन कन्या कटफळची सून झाली आहे.

कटफळ हे सोलापूर जिल्ह्याच्या अगदी टोकावरचे गाव. या गावातील गौतम महादेव सावंत हे वनखात्यात रेंज ऑफिसर होते. 

हे कुटुंब सध्या सातारा शहरात राहते. त्यांचा मुलगा अशुतोष याचे सध्या अमेरिकेतील वैविध्यपूर्ण लोकसंख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्निया राज्यात नोकरी करत आहे.

अशुतोष सावंत याने विवाहासाठी अमेरिकेत वधू-वर सूचक मंडळात नोंदणी केली. याच ठिकाणी डॉक्टर एलिझाबेथ हिनेही विवाहासाठी नोंदणी केली होती. यातून अशुतोष सावंत याची अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील

 डगल्स ओल्सन आणि मेरी क्रोफुट ओल्सन यांच्या व्हेटर्नरी डॉक्टर असणाऱ्या एलिझाबेथ हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

दोन्हीकडील कुटुंबांचे लग्नाबाबत बोलणे झाले. अन् बोलता-बोलता या लग्नास दोन्हीकडून मान्यताही मिळाली. हे लग्न भारतात आणि तेही सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील निसर्गरम्य वातावरणात गुरुवारी अतिशय थाटामाटात बौद्ध पद्धतीने पार पडले.

 या विवाह सोहळ्याला डॉ. एलिझाबेथ हिच्याकडील नातेवाइक, सावंत यांचे नातेवाईक तसेच सांगोला तालुक्यातील कटफळ येथील मूळ वऱ्हाडी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments