google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सामान्य ग्राहकालाही उत्तम बँकिंग सुविधा देणाऱ्या 'सूर्योदय अर्बन ची ' वाटचाल कौतुकास्पद... नामदार जयकुमार गोरे.

Breaking News

सामान्य ग्राहकालाही उत्तम बँकिंग सुविधा देणाऱ्या 'सूर्योदय अर्बन ची ' वाटचाल कौतुकास्पद... नामदार जयकुमार गोरे.

सामान्य ग्राहकालाही उत्तम बँकिंग सुविधा देणाऱ्या 'सूर्योदय अर्बन ची ' वाटचाल कौतुकास्पद... नामदार जयकुमार गोरे.


सूर्योदय अर्बनमुळे मंगळवेढ्याच्या वैभवात मोलाची भर... आमदार समाधानदादा आवताडे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

मंगळवेढा (प्रतिनिधी)- उद्योजक, मोठे व्यापारी याबरोबरच छोटे मोठे व्यावसायिक आणि सर्वसामान्य ग्राहकांना देखील सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा उत्तमरीत्या पुरवणाऱ्या' सूर्योदय अर्बन' या संस्थेची वाटचाल अत्यंत कौतुकास्पद असल्याचे

 गौरवोद्गार महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी काढले. सूर्योदय अर्बन महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या मंगळवेढा येथील शाखेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

मंत्री महोदयांच्या शुभहस्ते या बँकेचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले. अलीकडच्या काळामध्ये वित्तीय संस्था चालवणे म्हणजे एक आव्हान ठरत असताना सूर्योदय अर्बन सारख्या संस्थेने मंगळवेढा, सांगोला आणि सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये ग्राहकांचा संपादन केलेला

 विश्वास कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. लॉकर्स सुविधा, एटीएम सुविधा यासह अनेक प्रकारच्या बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या सूर्योदय अर्बन या संस्थेमुळे

 मंगळवेढ्याच्या वैभवात मोलाची भर पडल्याचे मत पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांनी यावेळी व्यक्त केले. या संस्थेचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले आणि त्यांच्या टीमचे यावेळी त्यांनी विशेष कौतुक केले.

 याप्रसंगी युवा नेते व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, पक्षनेते अजित जगताप, सोमनाथ बुरजे, सूर्योदय अर्बनचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, डॉ बंडोपंत लवटे, सुभाष दिघे गुरुजी,

 जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष सुरवसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांसाठी या संस्थेने भव्य लॉकर्स व एटीएम सुविधा उपलब्ध करून दिली असून त्याचबरोबर क्यू आर कोड, आरटीजीएस, एनईएफटी, चेक

 क्लिअरिंग एसएमएस व मोबाईल अॅप सुविधा, ठेवींवरती आकर्षक व्याज तसेच विविध प्रकारच्या कर्ज योजना यासह अनेक प्रकारच्या सुविधा या संस्थेने उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती यावेळी अनिलभाऊ इंगवले यांनी दिली.

 स्थापनेपासून सतत ऑडिट वर्ग' 'अ' असलेली ही संस्था असून त्वरित सोनेतारण कर्ज मंजूर करणारी ही संस्था आहे. प्रति तोळा 80 हजार रुपये इतके सोनेतारण कर्ज दिले जाते. 

या शुभारंभ प्रसंगी माजी सभापती संभाजी गावकरे सर, दामाजीचे संचालक बसवराज पाटील, भारत बेदरे, दामाजी कारखान्याचे माजी संचालक भारत निकम, शिक्षक संघटनेचे राज्याचे नेते संजय चेळेकर, 

सुवर्णरत्न मल्टीस्टेटचे महादेव बिराजदार, विठ्ठल काळुंगे, साहेबराव शिंदे, डॉ धवलसिंह आवताडे, संभाजी तानगावडे, सिद्धेश्वर कलुबरमे, शिवाजी गण पाटील, शिवानंद कोळी, प्रकाश अवताडे, वैभव लक्ष्मीचे चेअरमन वैभव लेंडवे इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 बदलत्या काळानुरूप गतिमान बँकिंग सेवा, डिजिटल बँकिंग, सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधा, लॉकर्स आणि एटीएम यामुळे नोकरदार तसेच छोटे-मोठे उद्योग आणि व्यावसायिक यांच्यासाठी ही संस्था वरदान असल्याचे मत अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments