खळबळजनक...महुद येथे ३० हजारांची हातभट्टी जप्त तीन हजार लिटर दारू अन् सहा बॅरलसह युरिया सापडला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला हातभट्टी अड्यावर पोलिसांनी अचानक धाड टाकून केलेल्या कारवाईत २४ हजारांची १२०० लिटर प्लास्टिकच्या बॅरल मधील गूळ मिश्रित रसायन, कॅन मध्ये भरलेली
३ हजारांची ५० लिटर तयार हातभट्टी दारू जप्त केली. तसेच २४०० रुपयांचे ६ रिकामे बेरेलसह ४०० रुपये किमतीचा यूरिया, नवसागर कांड्या आदी साहित्य
मिळून २९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान गूळ मिश्रित रसायन जागेवरच नष्ट केले.
याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमर पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लखन रामचंद्र पवार (रा.महूद, विठ्ठलवाडी, ता. सांगोला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल असलम काझी, मच्छिंद्र राजगे, कॉन्स्टेबल अमर पाटील हे कटफळ हद्दीत गस्त घालीत होते. महूद येथील सुहास कांबळे यांच्या शेतात
विहिरीजवळ चिलाराच्या झुडुपात लखन पवार (रा. महूद ता. सांगोला) हा हातभट्टी चालवीत असल्याची माहिती मिळाली होती. दरम्यान पोलिसांनी धाड टाकून हातभट्टीची जप्त केली, त्यानंतर ती जागेवर नष्ट केली.


0 Comments