google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक...सांगोला तालुक्यातील महूद येथील गोडावूनला मध्यरात्री लागली आग; लाखोंचे नुकसान

Breaking News

खळबळजनक...सांगोला तालुक्यातील महूद येथील गोडावूनला मध्यरात्री लागली आग; लाखोंचे नुकसान

खळबळजनक...सांगोला तालुक्यातील महूद येथील गोडावूनला मध्यरात्री लागली आग; लाखोंचे नुकसान


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुक्यातील महूद येथे अचानक गोडाऊनला लागलेल्या आगीत डिप फ्रीज, मेंढ्यांची लोकर, केबल वायर, लाकडी टेबल, प्लास्टिक ताडपत्री व इतर साहित्य जळून अंदाजे एक लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना

 मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महूद येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास संस्था येथे घडली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महूद व्यवस्थापक पोपट अनंता कारंडे यांनी दिलेल्या

 खबरीनुसार १७ मार्च रोजी रोजी ते नेहमीप्रमाणे महूद येथील मेंढी व शेळी विकास संस्थेत सकाळी आठ वाजता कामाला जातात व सायंकाळी पाच वाजता घरी परत येतात. या पाच वाजता घरी परत येतात.

या संस्थेत भीमराव लक्ष्मण माने हे वॉचमन म्हणून कामावर होते. दरम्यान, मंगळवारी साडेबाराच्या सुमारास कारंडे यांना फोन आला की रात्री ११ वाजता लाईट गेली होती

 आणि त्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास अचानक संस्थेच्या स्टोअर गोडवूनला आग लागली आहे. हे समजल्यानंतर व्यवस्थापक पोपट कारंडे, शिवाजी मोरे, बबलू चौगुले असे सर्वजण आग लागलेल्या ठिकाणी गेले

 असता गोडावूनमधील डिप फ्रीज, मेंढ्यांची लोकर, केबल बायर, लाकडी टेबल, प्लास्टिक ताडपत्र्या व इतर आवश्यक असणारे सामान असे सुमारे एक लाख ४० हजार रुपयांचे साहित्य जळून भस्मसात झाले होते. 

आग ही नेमकी कशामुळे लागली हे समजले नाही. याची चौकशी करावी, असे पोपट कारंडे यांनी पोलीस ठाण्याला दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments