सांगोल्यातील ४२ हजार ४४२ शेतकऱ्यांनी काढले शेतकरी ओळखपत्र तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव
सांगोला तालुक्यातील १ लाख ८ हजार ८२० खातेदार शेतकऱ्यांपैकी सोमवार दि. १७ मार्च अखेर ४२ हजार ४४२ शेतकऱ्यांनी ‘फार्मर आयडी’ काढले असून, हे काम ४६ टक्के इतके झाले आहे.
येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व ७/१२ धारक शेतकन्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे असे आवाहन कृषी विभागातर्फे तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी केले आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत. येथील शेतकरी नेहमीच नवीन तंत्रज्ञान आणि उपाय शोधत असतात.
जेणेकरून शेती अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर करता येईल. या दिशेने सरकारने किसान डिजिटल आयडी कार्डचा पुढाकार घेतला आहे. यामुळे शेतीमध्ये क्रांतिकारी बदल घडू शकतात.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी डिजिटल आयडी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार सांगोला तालुक्यात सर्वत्र शेतकरी ओळखपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकरी ओळखपत्र ही आधारशी जोडलेली एक अनोखी डिजिटल ओळख आहे. फार्मर आयडी म्हणजे शेतीचे आधार कार्डच आहे.
शेतकन्यांसाठी शासन नवनवीन योजना जाहीर करत आहे. मात्र या योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर फार्मर आयडी अनिवार्य आहे. या फार्मर आयडीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीची माहिती संकलित होणार आहे.
त्यात क्षेत्र, गाव, गट नंबर याचा समावेश असणार आहे. त्यात पीक कर्ज व त्या व्यतिरिक्त आणखी कुठले कर्ज घेतले आहे का, याचीही माहिती यात संकलित होणार आहे.
यामुळे शेतक-याचा कायमस्वरूपी डेटाबेस तयार होणार आहे. दरम्यान नैसर्गिक आपत्ती आली किंवा अतिवृष्टीने वा अन्य कारणाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले
तर त्याला शासकीय मदत मिळणे ही सोईस्कर होणार आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क करावा. यासह गावोगावी शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी कॅम्पचे नियोजन करण्यात आले आहे
तरी ज्या शेतकऱ्यांनी आज अखेर फार्मर आयडी शेतकरी ओळखपत्र काढलेले नाही अशा शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर दिपाली जाधव यांनी केले आहे. आयडी काढून घ्यावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी
0 Comments