राज्यात जे धर्मादाय हॅास्पिटल आहेत तिथे गोरगरीब,
सर्वसामान्य जनतेला व्यवस्थित रूग्णसेवा मिळावी आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यात सक्षमपणे व सुरळीत सुरू राहून रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा होण्याकरिता आज विधानसभा अध्यक्ष
मा.ना.राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी बैठकीत बोलताना आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख म्हणाले
की, राज्यात जे धर्मादाय हॅास्पिटल आहेत तिथे गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला व्यवस्थित रूग्णसेवा मिळावी त्याचबरोबर खाजगी हॅास्पिटल कडून रूग्णांची होणारी आर्थिक फसवणूक थांबविण्यात यावी.
त्याचबरोबर महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्यात सक्षमपणे व सुरळीत सुरू राहून रुग्णांना याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. यावेळी विधानसभा अध्यक्ष मा.ना.राहुल नार्वेकर यांनी तातडीने याची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेला सूचना देत
धर्मादाय हॅास्पिटल तसेच खाजगी हॅास्पिटल येथे गोरगरीब रुग्णांना वेळेवर उपचारांसाठी मदत करण्याचे आदेश दिले. या बैठकीला आ.समाधान आवताडे, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आ.सुनील प्रभू आ.भास्कर जाधव आ.कालिदास कोळंबकर आदी उपस्थित होते.
0 Comments