google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार रणजितसिंहजी मोहिते - पाटील यांचे चिरंजीव विश्‍वतेजसिंह व शिवांशिका यांच्या विवाह प्रित्यर्थ मुंबई येथे ठेवलेल्या रिसेप्शन सोहळाला

Breaking News

आमदार रणजितसिंहजी मोहिते - पाटील यांचे चिरंजीव विश्‍वतेजसिंह व शिवांशिका यांच्या विवाह प्रित्यर्थ मुंबई येथे ठेवलेल्या रिसेप्शन सोहळाला

आमदार रणजितसिंहजी मोहिते - पाटील यांचे चिरंजीव विश्‍वतेजसिंह व शिवांशिका


यांच्या विवाह प्रित्यर्थ मुंबई येथे ठेवलेल्या रिसेप्शन सोहळाला

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेसह दिग्गज मंत्री महोदयांची उपस्थिती 

सांगोला/प्रतिनिधीः माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू तथा आमदार  रणजितसिंहजी मोहिते - पाटील यांचे चिरंजीव विश्‍वतेजसिंह व शिवांशिका यांच्या विवाह प्रित्यर्थ मुंबई येथे ठेवलेल्या

 रिसेप्शन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस व राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचेसह दिग्गज मंत्री महोदयांनी उपस्थिती दाखविली. 

हॉटेल सेंट रिजेस मुंबई येथे चि. विश्‍वतेजसिंह मोहिते -पाटील आणि सौ. शिवांशिका यांच्या शुभविवाह निमित्ताने स्वागत समारंभ मुंबईत आयोजित करण्यात आला होता. 

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभाशीर्वाद दिले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू ,

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मा.ना. मंगलप्रभात लोढा, ना. शिवेंद्रराजे भोसले, ना.मकरंद पाटील, .ना. शंभूराजे देसाई,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, छगन भुजबळ, मनसे अध्यक्ष मा.राज ठाकरे,

ना. जयकुमार रावल, जयंत पाटील,ना. प्रताप सरनाईक, ना. अदिती तटकरे, आ. मिलिंद नार्वेकर आ. सचिन आहीर मा. हर्षवर्धन पाटील, आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, दिग्दर्शक बोनी कपूर, 

अभिनेते रितेश देशमुख, सौ. जेनेलिया देशमुख, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय पाटील,खा. संजय राऊत,आमदार राहुल आवाडे ,कृष्णराज महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंहजी मोहिते पाटील खासदार धैर्यशिलभैय्या मोहिते पाटील,

सौ .नंदिनीदेवी विजयसिंह मोहिते पाटील ,सौ सत्यप्रभादेवी मोहिते -पाटील ,सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांच्यासह मोहिते कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments