नागरीकांनो सावधान…पोलिसांचा पहारा सुरू आहे; तरी देखील सांगोला आठवडा बाजारात चोरट्यांचाच दरारा..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- गेल्या काही दिवसांपासून सांगोला शहरांमधील चोरीचे सत्र थांबेनात अशीच एक मोटरसायकल चोरीची घटना दि. १५ फेब्रुवारी २५ रोजी रात्री १०:०० वाचे सुमारास वैभव अपार्टमेट,
गौरी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे सह्याद्री नगर, सांगोलाच्या पार्किंग मध्ये फिर्यादी यांची टी. व्ही. एस. राईडर या कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल नंबर एम. एच. ४५ बी. ए. १५२५ लावुन घरात गेले होते
त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजता फिर्यादी हे मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी पाहिले असता त्यांनी लावलेल्या त्यांची टी. व्ही. एस राईडर या कंपनीची मोटार सायकल नंबर एम.४५ बी. ए. १५२५ ही मिळुन आली नाही.
त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांच्या मोटार सायकलचा आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तेव्हा त्यांनी व त्यांच्या घरातील लोकांनी आजुबाजुला मोटार सायकलचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही.
म्हणून त्यांची खात्री झाली की, सदर मोटार सायकल ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने संमती वाचुन मुद्दाम लबाडीने चोरुन नेली असल्याची फिर्याद योगेश चंद्रकात देशमुख रा. सह्याद्री नगर, सांगोला यांनी दिली
असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे. एखादा दिवस वगळता सांगोला शहरांमध्ये कोठे ना कोठे चोरीची घटना घडत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments